लाखो रुपयांचे नुकसान ; पेट्रोल टाकून दुकाने पेटवल्याचा संशय
नवापूर- शहरातील देवळफळी चौफुली लगत 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री तीन वाजेचच्या दरम्यान अज्ञात इसमांनी दोन दुकांनावर पेट्रोल टाकुन आग लावुन ती नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. नवापूर शहरातील देवफळी भागातील नॅशनल हायवेलगत असलेल्या शिवदास सोनु देसाई यांची नास्त्याची दुकान जवळच असलेल्या दिलीप नामदेव सोनवणे यांची राजमाता मेन्स पार्लर दुकान या घटनेत जळाली. शिवदास देसाई यांचे नास्त्यांचे दुकानात दोन प्रायमस स्टो, एक मोठा टेबल,ड ायनिंग टेबल,मोठे, अॅल्युमिनियमचे पातेले, एक जार, सात स्टिलच्या थाळ्या,लोखंडाचे 9 पत्रेे बारा फुटी, लोखंडाचे तराजु,दोन लोखंडाचा बादल्या,लाकडी लोरी जीवनावश्क वस्तु, इन्वेटर, दोन लोखंडी टेबल,दोन दरवाजा लोखंडी असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच राजमाता मेन्स पार्लस दुकानात एक पंखा,दोन खुर्ची,चार काचेचे आरसे,बाग, फर्निचर,दोन सलुनचा खुर्ची,दोन कपाट,मीनी इर्न्व्हटर तसेच दुकानाचा सर्व सामान असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दुसर्यांदा दुकान जाळण्याचा प्रयत्न
मागचा वर्षी सुध्दा ही दुकाने जाळण्याचा प्रयत्न झाला होता. दुकानदारांनी नवीन भांडवल उभारुन दुकाने उभी केली असतांना पुन्हा दुकान जाळण्यात आल्याने हे कृत्य कोणाचे ? यामागे कोण आहे..? कोणाशी दुश्मनी तर नाही ना..? कोण करत आहे हे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.