नवापूर । नवापूर शहरात एकाच रात्री एकाच परिसरात तीन ठिकाणी घरफोडीची घटना घडली असून नाताळचा सूटीची संधी साधत चोरटे आपले हात साफ करीत आहेत. या चोरीमुळे सुटीत बाहेर गावी गेलेले व त्यांचे घर चोरट्यांचा रडारावर असुन प्रभाकर काँलनीत एकाच रात्री अनेक चोर्यांमुळे खळबळ उडाली आहे. पाच पेक्षा अधिक चोरट्यांची लुंगीधारी टोळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाताळचा सूट्या लागल्याने बहूतेक नागरीक सूट्याचा आनंद घेण्यासाठी परिवारा सहीत बाहेर गावी गेल्याची संधी साधत बंद घरात घरफोडी झाल्याची घटना प्रभाकर कॉलनीत घडली. येथील राणीकूंड येथील शिक्षक देवा पावरा वडकळंबी येथील पवार सर तसेच कैकाडे या एकाच परिसरात चोरट्यांनी मध्य रात्री डल्ला मारला. चोरट्यांना तिघा घरातील सामान आस्तव्यस्त फेकून कपाट फोडून त्यातील सामानाची झडती घेतली नेमके काय सामान चोरीस गेला आहे. याची माहिती संबंधित घरमालक नसल्याने कळू शकली नाही. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.