नवापूरात नगराध्यक्षा रेणुका गावीत यांच्याहस्ते ध्वजारोहण

0

नवापूर । शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवापुर पोलिस स्टेशन आवारात ध्वजारोहण तहसिलदार प्रमोद वसावे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, नायब तहसिलदार राजेंद्र नजनसह सर्व पोलिस कर्मचारी व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच नवापुर पंचायत समितीयेथे ध्वजारोहण उपसभापती दिलीप गावीत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपगटविकास अधिकारी बी.डी गोसावी,कक्ष अधिकारी वाय.डी.सरदारांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच नवापुर शहरातील सरदार चौक येथे ध्वजारोहण नगराध्याक्षा रेणुका गावीत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सी. ओ. राजेंद्र शिंदे यासह सर्व नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. तसेच नवापुर नगरपालिकेत ध्वजारोहण उपनराध्यक्ष हारुण खाटीक यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सर्व नगरसेवक व न.पा कर्मचारी उपस्थित होते. तसेच पोलिस ग्राऊड मैदानावर ध्वजारोहण तहसिलदार प्रमोद वसावे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पक्षाचे नेतेगण कार्यक्रर्ते उपस्थित होते. तसेच अशरफभाई मजिदभाई लाखानी अल्पसंख्याक विकास बहुउद्देशिय संस्था सचंलित गुजराथी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष इम्तियाज लाखाणी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कैलाश अग्रवाल,संस्थेचे सचिव परवेज लाखाणी,जिल्हा शिक्षण उपशिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण,मधुकर पाटील,अ‍ॅड. अनिल शर्मा,अ‍ॅड. राखी शर्मा, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

वनविभाग कार्यालयात ध्वजारोहण
तसेच सार्वजनिक गुजराथी हायस्कुल येथे ध्वजारोहण उपमुख्याध्यापक एम.आय.छोटा यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक मोहमत मुल्ला,आसिफ शेख, बी.आर.चौधरी आदी उपस्थित होते. तसेच मार्च शिक्षण संस्था संचलीत वनिता विद्यालय येथे ध्वजारोहण अरुण गावीत यांचा हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे संचालक, मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. तसेच मार्च शिक्षण संस्था संचलीत डी.एड.कॉलेज येथे ध्वजारोहण देविदास हिरे याच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रार्चाय अनिल वेडाईज सह सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. तसेच नवापुर वनविभाग कार्यालयात ध्वजारोहण वनक्षेत्रपाल पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी वनपाल ए.एन.जाधव.कृष्णा वळवी,सह सर्व वन कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ गावाचा नारा देत प्रभात फेरी
तसेच श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे ध्वजारोहण कार्यक्रम शाळेच्या वरीष्ठ शिक्षिका एम.एस. खूटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नेमीचंदजी अग्रवाल, निवृत्त शिक्षक एस.आय. पाटील, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष नितीन माळी, प्राचार्य मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक डी.बी. बेंद्रे, पर्यवेक्षक एम.जे. सोनवणे, ए.बी. थोरात हे उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ गाव सुंदर गाव असा नारा देत प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रसंगी शाळेत देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक प्राचार्य एम.एस. वाघ यांनी केले. सूत्रसंचालन नारायण मराठे यांनी तर आभार जे.ए. पाठक यांनी मानले. यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक पी.यू. माळी, एम. टी. पाटील व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कामकाज पाहिले.

स्वातंत्र्यदिनी नवापूर तालुक्याचा सन्मान
नवापूर । स्वच्छ भारत मिशन (ग्राम) अंतर्गत नवापूर तालुक्यात सन 2016-17 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते नवापूरचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आणि सभापती सविताबाई गावीत यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्ट,जिल्हा पोलीस प्रमुख राजेद्र डहाळे आदि उपस्थित होते. याबरोबरच जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून कारेघाट ता.नवापूर ला 50 लाखाचे बक्षिस तर नानगीपाडा ग्रामपंचायतला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांकासाठी गौरवण्यात आले आहे. सभापती सविता गावित,उपसभापती दिलीप गावीत, विस्तार अधिकारी किरण गावीत,दिलीप कुवर कारेघाटचे गंडे आप्पा,दिलीप गावीत फतुबाई गावीत, नानगीपाड्याचे सुर्वे आप्पा,जैन आप्पा या सर्वांचे अभिनंदन होत असुन समाधान व्यक्त होत आहे.