नवापूर येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत काका-पुतणे, सासू-सुना, देराणी-जेठाणीसह बहिणी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी करत आहे. नातेवाइकांमध्ये होणार्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसने हेमलता पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शहर विकास आघाडीच्या सोनल पाटील यादेखील रिंगणात आहेत. हेमलता पाटील व सोनल पाटील या एकमेकांच्या नातेवाईक आहेत. सोनल पाटील या अजय पाटील यांच्या सख्ख्या मामेबहीण आहेत. दुसरीकडे नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्र.7 मधून पाटील समाजाचे सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागातून काँग्रेसने दर्शन प्रताप पाटील आणि शिवसेनेने दर्शन दीपक पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ते चुलत काका-पुतणे आहेत. याच प्रभागात महिला राखीव गटातून पाटील समाजातील एकमेकांशी नातेगोते असलेल्या तब्बल 4 महिला परस्परविरोधात निवडणूक लढवित आहेत. त्यात काँग्रेस उमेदवार सीमा मदन पाटील, शिवसेनेच्या अरुणा हसमुख पाटील, राष्ट्रवादीच्या विमलबाई बाबूलाल पाटील तर शविआच्या वनिता तुळशीदास पाटील यांचा समावेश आहे. सीमा पाटील या अरुणाबाई पाटील यांच्या सख्ख्या चुलत पुतण सून आहे. तसेच विमलबाई या सीमा पाटील यांच्या चुलत नणंदचा सासू तर अरुणा पाटील यांच्या सख्ख्या चुलत मावशी आहेत. प्रभाग क्र.8 मध्ये काँग्रेसचे दामू वना बिर्हाडे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र देविदास नगराळे यांच्यात लढत होत आहे. हे दोघेही जवळचे नातेवाईक आहेत. दामू बिर्हाडे हे नरेंद्र नगराळे यांचे सख्ये चुलत काका आहेत. याच प्रभागात महिला गटातून काँग्रेसच्या रेखाबाई चंद्रकांत नगराळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता मनोहर नगराळे व अपक्ष उमेदवार लक्ष्मीबाई मनू बिर्हाडे यांचे एकमेकांमध्ये नाते आहे. रेखाबाई व सविताबाई या नात्याने सख्ख्या चुलत देराणी-जेठाणी आहेत. लक्ष्मीबाई या नात्याने दोघींच्या मावस सासू आहेत.
प्रभाग क्र.5 मधून काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षा रेणुका गावित तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपमाला मावची परस्परविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्या एकमेकांच्या सख्ख्या चुलत देराणी-जेठाणी आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीतही दोघींनी परस्परविरोधात निवडणूक लढविली होती. निवडणूक खेळ म्हणूनच व्हावी. पराभूत उमेदवार व समर्थकांनी त्यानंतर वैमनस्य ठेवून अवघ्या समाजाला वेठीस धरून उगाच तणाव निर्माण करू नये अशीही जनमानसातील अपेक्षा आहेच. उगाच समाजातच गटबाजीचे वैमनस्य होऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम सगळ्या दुरगामी भोगावे लागतात. यासाठी सर्वानीच खबरदारी घ्यावी, अशी नवापूरकरांची अपेक्षा आहे या निवडणुकीत जातीपातीचा राजकारणाने जोर धरला आहे. एकाच प्रभागात दोघ एकाच जातीचे उमेदवार जास्त आहेत. जाती निहाय समीकरण मांडले जात आहे. समाज निहाय गोळाबेरीज व संबधीत उमेदवार कोण यावरुन मतेमंतातरे व मनाचा एक्झीट पोल सांगत आहेत. प्रथमच मतदान करणार्या नवमतदारांची संख्या ही यावेळी जास्त असुन मतदानाविषयी त्यांचात उत्साह दिसुन येत आहे. या मतदाराचा निनडणुकीवर परिणाम ठरणार आहे. कारण नवमतदारांचे विचार व जुने मतदार यांचे मनाजीराव व विचारचक्र तसेच नवे जमाने के साथ असल्याने त्यांची मते वळणारी ठरु शकतात. नवापूरात 20 नगरसेवक व 1 महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडुन द्यावयाचा आहे प्रचार आता अंतीम टप्प्यात आला असुन तो शिंगेला पोहचला आहे.अलीकडे जातीपातीचे राजकारण वेगळेच वळण घेत असुन मुस्लीम मते आपल्याकडे वळविण्यासाठी सर्वच जोर लावत आहे समाज निहाय काही उमेदवारांनी बैठका ही घेतल्या आहेत विविध पक्षांनी बहुसंख्य समाजाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. वैयक्तिक संबध, उमेदवार कोण, नातेगोते, मनीराम हे सर्व पाहुन मतदान केले जाईल. प्रत्येक उमेदवाराने मतांचे जास्त जास्त दान मिळावे म्हणुन खुपच मेहनत केली आहे.
आपल्या प्रभागातील मतदाराला जेवण, पार्टी, तारीफ पे तारीफ करुननंतर कार्यकर्त्यांना रोज चमचमीत जेवण देऊन खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मतदान दिवसाचे नियोजन करण्यात येत आहे. प्रचार कंबर कसली, वाकुन वाकुन मतदारांचे चरणस्पर्श करतांना कंबर दुखायला लागली आहे,खर्च पण लयी झाला राव, प्रत्येक मतदाराकडे अनेक चकरा मारुन चप्पल घसली गेली. रात्री लक्ष्मी दर्शन झाले आहे. रात्र जागुन काढली आहे अनेक अफवा बदनामीचे लोण काही दिवस सुरु होते अंतीम टप्प्या नंतर सर्व करुन लाखो रुपये पाण्यासारखे वाहत डोळ्या देखत वाहत गेले हे सर्व करुन याचा कितपत फायदा उमेदवाराला होतो मतांची विभागणी कशी होईल, मतदार कोणाला कौल देणार राकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्रा अनेक दिवांपासून प्रचार सुरू असून जोरदार प्रचारामुळे मतदानाकडे शहरवासीरांचे लक्ष लागून आहे. रा मतदान प्रक्रिरेसाठी आता प्रशासकीर रंत्रणा पूर्णतः सज्ज झाली असून बुधवारी मतदान होणार आहे. अनेकांनी रा निवडणुकीत पक्षाकडून आपल्राला डावलण्रात आले म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल केली असून अनेकांनी दुसर्रा पक्षाचा आधार घेतला.
– हेमंत पाटील, नवापूर
9823610627