नवापूरात नियमबाह्य बांधकाम केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी साकळी उपोषण

0

 नवापूर। मागील कित्येक वर्षापासून शहरात नियमबाह्य बांधकाम करून कोणतीही सुविधा देत नसलेल्या व्यापारी संकुलनामुळे उद्भवणारा वाहतूक प्रश्न, पार्किंग प्रश्न, संडास, मुतार्‍याच्या प्रश्न व त्यासह नाना विविध समस्यांमुळे नवापुरकर जनतेला अगनीक त्रास सहन करावा लागतो. नवापूर शहरात वाहतूक समंस्या गंभीर स्वरुपाची बनत चाललेली आहे. भविष्यात हि समंस्या उग्र स्वरूप धारण करेल, यात तीळमात्र शंका नाही. रोज मितीला शहरात फोर व्हिलर, थ्री व्हिलर, टू व्हिलर नवनवीन गाड्या दाखल होत आहेत, तसेच तालुक्यातून जो पण शहरात येतो. तो गाडी शिवाय येत नाही आणि त्यातच भर म्हणून शहरातील शॉपिंगमॉल वाल्यांनी नगरपालिकेच्या वरदहस्ताने पार्कीगसाठी जागा न सोडता शौचालय व मूतारीच्या जागेवर देखील दूकान बनून आपल्या फायद्यासाठी जनतेला या सर्व सूविधान पासून वंचीत ठेवलेले आहे. जनता गूमानपणे या सर्व हाल आपेस्टा भोगत आहे. अशा नगर प्रशासन संबधितांनवर कडक कार्यवाई व्हावी यासाठी शिवसेनेने 15 ऑगस्ट पासून बेमुदत तहसिलदार यांच्या कार्यालयाच्या प्रांगनात बेमूदत साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आले होते.

कार्यवाहीची हमी दिल्यावर उपोषण मागे
संबधीत विषयाचे निराकरण करने कामे तहसीलदार प्रमोद वसावे यांनी लीड घेऊन दूपारी 12 वाजता नवापूर तहसील कार्यालयात नवापूर न.पा.चे मूख्याधिकारी राजेद्र शिंदे, पो.नि.विजयसिंग राजपुत, नगर अभियंता सुधीर माळी यांना तात्काळ पाचारण करून आंदोलकांच्या भावना जाणुन उपरोक्त मागन्याचे निराकरण करने कामी आदेश दिलेे. त्यावर मूख्याधिकारी यांनी सांगीतल कीे नपा प्रशासनाने संबधितांनवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. येणार्‍या 8 दिवसात 42 खाजगी संकूलांना नोटीसा बजाऊन कार्यवाही करण्यास भाग पाडू व जे प्रतिसाद देणार नाही. जिल्हा अधिकारी यांना खोटी माहीती देनार्‍या तत्कालीन मूख्याधिकारी यांचा गोपनीय अहवाल मागवुन दोन दिवसात कार्यवाही करण्याचे तहसीलदार यांनी हमी घेतली व सर्व पाहणी करून पुर्णत्वाचा दाखला देनार्‍यांवर देखील कार्यवाही करणार असल्याची हमी आंदोलकांना दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

यांची होती उपस्थिती
त्याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमूख हसमूख पाटील, तालूकाप्रमूख गणेश वडनेरे, माजी नगरसेवक तथा माजी पोलीस उपायूक्त रतन गावीत, शहर प्रमूख गोविंद मोरे, कामगार सेनेचे राजेश जयस्वाल, उपतालूका प्रमूख प्रविण ब्रंम्हे, उपशहरप्रमुख आनिल वारूडे, उपशहरप्रमूख दर्पण पाटील, मनोज वाडीले, निलेश सोनार, रविद्र सोनवणे, यूवासेना शहराधिकारी राहूल टिभे, वाहातूक सेनेचे आनंद वाघ, हरीश दर्जी, शामराव चौधरी, विभाग प्रमूख दिनेश खैरनार, विभाग प्रमूख संतोष पाटील, गोपी सैन, यूवासेना राहूल पंचोली, भटू पाटील, संकेत पाटील, शिवसेना महिला आघाडीचा उपजिल्हा संघटक ज्योती चौधरी, शहर संघटक उज्वला वडनेरे, विद्या चौधरी, अरूणा पाटील, यशोदा अग्रवाल, निर्मला चौधरी, मंगला मोरे, सोनी सोनवणे, आदीनी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. आंदोलनाला भाजपा, राष्ट्रवादी, शविआ, राष्ट्र जागृती यूवा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,, पत्रकार कर्मचारी, सामाजीक कार्यकत्यांनी व महिलांनी देखील स्वाक्षर्‍या करून पाठींबा दर्शवला.