नवापूरात पतंजली महिला योग समितीतर्फे वृक्षदिंडी

0

नवापूर। येथील पतंजली महिला योग समितीतर्फे वृक्षदिंडी व वृक्षदिंडींचा स्तुत्य कार्यक्रम राबविण्यात आला श्रमिक कष्टकरी भागात वृक्षदिंडीतून वृक्षलागवडीचे प्रबोधन व प्रचार करुन प्रत्यक्ष वृक्षलागवड महिलांनी केले. पतंजली म.यो.स.ता.लालबारी येथे जि.प. शाळा व तेथील घरासमोरील जागेत आवळा, पेरु, सिताफळ, चिकु वड, पिंपळ, गुलमोहर, कडुनिंब व इतर झाडे लालबारीतील महिला ज्याचा वाढदिवस होता. मिना शहा व राधाताई यांच्याहस्तेे वृक्षरोपण करण्यात आले व गावातुन वुक्षदिडी काढण्यात आली. या दिंडीत महिलांचा व मुला मुलीचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे आयोजन पतंजली महिला योग समितीचे जिल्हा प्रभारी महांनंदा पाटील, मंगल चव्हाण, योग प्रचारक विद्या चौधरी, जयक्षी सोनवणे, मिडीया मंत्री ज्योती चौधरी, उज्वला वडनेरे, मंदा गावीत, मीना शहा यांनी केले कार्यकमाला कमल शहा, रायते मॅडम, प्रियंका पाटील, सिमा काळे ,प्रज्ञा पवार, कांता मावची, वेची बाइ, ज्योती मावची यासह बालगोपालांची उपस्थिती होती.