नवापूरात बरसला मुसळधार पाऊस

0

नवापुर। शहर व परिसरात पावसाने जुन महिन्या पासुन दडी मारल्याने, कोरडा जात असतांना दि.23 ला सकाळपासून वातावरणात बदल झाला व प्रचंड उष्माने नागरिक घामाघूम होत होते. अचानक रिमझम बरसणारा पाऊस सकाळी 10 वाजता मुसळधार बरसला. अधुन मधुन ऊन सावली, उष्मा असे वातावरण झाले होते. पाऊस जोरदार बरसल्याने नागरिक गारव्याने मुग्ध झाले.जुन महिन्यात फक्त एक दोन दिवस रिमझिम पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकरी शेती कामात व्यस्त झाला अनेकांनी पेरणी करून टाकली होती. माञ पावसाने पाठ फिरवली आणि शेतकरी चिंतातूर झाला होता.

डांबरीकरण रस्त्याचे बारा वाजले
संपूर्ण दिवस हिच परिस्थिती होती.या मुसळधार पावसामुळे शहरातील बसस्थानक, मेनरोड, लाईट बाजार, नाल्यावरील रस्ता मार्गावर जागोजागी पाणी साचुन डबके साचले आहे तर शहरात नगर पालिकेने नव्याने तयार केलेल्या काही भागातील डांबरीकरण रस्त्याची बारा वाजले असुन निकृष्ट कामाचा उत्कृष्ट पुरावा पावसाने हजेरी लावून उघड केला आहे. दोन चार महिन्यापुर्वी बनवलेल्या डांबरीकरण रस्त्याची खडी डांबर निघुन गेले आहे व तेथे खड्डे पडुन डबके साचले आहे.काही भागात तलावाचे स्वरूप आले आहे.लाखो रूपये खर्चून तयार केलेले रस्ते असे बनवुन त्यातून मलाई खाण्याचा प्रताप जनतेने निवडून दिलेल्या प्रभागातील काही प्रतिनिधीनी केलेला दिसतो आहे. असा आरोप व संतप्त प्रतिक्रया व्यक्त केली जात आहे.डांबरीकरण रस्ता तयार होत असतांनाच प्रभागातील रहिवाशांनी डांबरीकरण रस्ता कामाबद्दल शंका व तक्रारी केल्या होत्या त्या खर्‍या ठरल्या आहेत.

दिवसभर ऊन सावलीचा लंपडाव
ऊन सावलीचा लपंडाव सुरू झाल्याने श्रावण महिना सुरू झाला की काय असा भास होत होता. त्यानंतर 12 वाजेला पुन्हा मुसळधार पाऊस होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पाऊस एकसारखा न बरसता कधी तो जोरात तर केव्हा हळूहळू कमी जास्त प्रमाणात बरसत होता. या पावसाने नवापुरकरांना व शेतकर्‍यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

सर्वत्र गारवा,जलमय वातावरण
पावसाने हजेरी लावून सर्वत्र गारवा निर्माण केला असून जलमय वातावरण झाले आहे. दुपारी 1 वाजे नंतर सततधार पावसाला सुरुवात झाली होती. शहर व तालुकासह पंचक्रोशीत भरपूर पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. 7 जून रोजी येणारा पाऊस यंदा 23 जुनला आल्याने या कालावधीत शेतकरी चिंतातुर झाला होता. श्री स्वामी समर्थ केद्रात पाऊस यावा म्हणून रूद्र अभिषेक व मल्हारी याग व होमहवन पुजा करण्यात येऊन विपुल प्रमाणात पाऊस यावा यासाठी सेवेकरी बंधु भगिनींनी प्रार्थना केली होती. आज पासून मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. त्याचा चेहर्यावर आनंद दिसुन येत आहे. दरम्यान बाजार पेठेत छञी, रेनकोट, ताडपञे, बी बियाणे, शेती अवजारे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी होत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन उकाडयाने नागरिक हैराण झाले आहेत.अजून सततधार व मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे सर्वत्र जलमय वातावरण निर्माण झाले आहे.

प्रचंड उष्माने नागरिक घामाघूम
दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असताना आज पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकरीवर्गाला काहीसा दिलासा देऊन गेला माञ हा मुसळधार पाऊस जोरदारपणे फक्त एक दोन मिनिटे बरसुन शांत झाला मध्येच वातावरण बदलले व ऊन सावली, पाऊसचा तिहेरी संगम संपूर्ण दिवस नवापूरकरांनी अनुभवला. जुन महिन्यात ओलीचिंब न झालेली जमिन आजच्या पावसाने चिंब भिजून, मातीचा सुगंध सर्वञ दरवळला होता. सकाळी 11 वाजेनंतर कडक ऊन पडुन उकाडा जाणवत होता.