नवापूर । सोमवारी आयोजित लोकशाही दिनात विभाग प्रमुखांनी दांडी मारत त्यांच्या प्रतिनिधींना पाठविल्याने लोकशाही दिनाची अधिकार्यांकडून थटट्टा सुरू असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यात लोकशाही दिन ’दीन’ झाला असून सरकारी यंत्रणा हा लोकोपयोगी कार्यक्रम बंद पाडणार का.? अशी व शंका व प्रश्न नागरिक व्यक्त करीत आहेत. नवापूर तहसीलदार प्रमोद वसावे यांनी अधिकार्यांच्याबाबतीत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
तक्रारींचे निवारण कसे होणार ?
नागरिकांच्या तक्रारी दूर व्हाव्यात, यासाठी होणार्या लोकशाही दिनाला विभागप्रमुख गैरहजर राहत आहेत. या दिवशी कोणत्या विभागप्रमुखांनी हजर राहायचे, याचे नियमन राज्य सरकारने केले आहे. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनाला तालुका वैद्यकीय अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, तालुका भूमिअभिलेख कार्यालय, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे विभाग प्रमुख न येता प्रतिनिधी पाठवले आणि उर्वरित वीज वितरण कंपनी, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन विभाग, पोलिस विभागातील अधिकारीही आले नाही आणि प्रतिनिधी पाठवण्याची तसदी घेतली नाही.
अधिकार्यांवर कारवाई?
नगरपालिका समस्यांचे निराकरण करत नसल्याने अधिकारी यांना धारेवर धरले होते. तसेच नवापूर तहसीलदार प्रमोद वसावे यांनी लोकशाही दिन गैरहजर बाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली. नवापूर आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अनेक जनतेच्या समस्या असतात तरी देखील अधिकारी लोकशाही दिनाला उपस्थित राहत नाही. एवढी उदासीनता का ? गैरहजर अधिकार्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.