नवापूर – शिक्षण विभाग पंचायत समिती नवापूर व नवापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विघामाने आयोजित ‘विज्ञान प्रदर्शन’ अशरफभाई मजिदभाई लखानी अल्पसंख्यांक विकास बहुउद्देशिय संस्था नवापूर संचलित गुजराथी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नवापूर लखानी पार्क येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंञी तथा आमदार सुरुपसिंग नाईक, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री माणिकराव गावित, नंदुरबार जि.प.अध्यक्षा रजनी नाईक, नवापूर तालुका कॉग्रेस कमिटी अध्यक्ष भरत गावित उपस्थित होते. मान्यवरांनाचा हस्ते विज्ञान प्रदर्शनांचे उद्घाटन संगणक कड दाबून करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी नवापूर नगरपालिका नगराध्यक्षा हेमलता पाटील, पंचायत समिती अध्यक्षा सविता गावित, जिल्हा परिषद सदस्या संगिता गावित, गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे, प्राथमिक उपशिक्षणधिकारी प्रा.डॉ.युनूस पठाण, अशरफभाई मजिदभाई लखाणी अल्पसंख्याक विकास बहद्देशिय संस्थेचे उपाध्यक्ष इम्तियाज लखाणी, संस्थेचे सचिव परवेझ लखाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमृत लोहार, विरोधी पक्ष नेते नरेंद्र नगराळे, नगरसेविका बबिता वसावे, अॅड. अनिल शर्मा, राखी शर्मा, जी.के.पठाण, दीपक वसावे, माजी नगरसेवक विनय गावित, सी.ए वतन अग्रवाल, शबनम पठाण, उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात एकूण १४४ उपकरणे
प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी विविध लक्षवेधी उपकरणे, प्रतिकृतींची मांडणी केली होती. त्यात प्राथमिक ५७,माध्यमिक ५३ , आदिवासी राखीव गटातून प्राथमिक व माध्यमिक २४ उपकरण शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य दोन्ही गटातून ८ लोकसंख्या १ व प्रयोग शाळा परिचर १ अशी एकूण १४४ उपकरणे मांडण्यात होती. प्रदर्शनात कृषी व जैविक शेती, आरोग्य व स्वच्छता, संसाधन व व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, गणितीय प्रतिकृती आदी विषयाशी निगडीत उपकरणे होती. २० डिसेंबरला रोजी बक्षिस समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे, सुत्रसंचालन सुरेश पाटील व धर्मिष्ठा पाटील यांनी तर नवापूर तालुका प्रदर्शनाचे रूपरेषा सुनिल भामरे यांनी सांगितली तर आभार प्रदर्शन सार्वजनिक हायस्कूलचे प्राचार्य मिलिंद वाघ यांनी केले. विज्ञान प्रदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक हरीश बोरसे, मुख्याध्यापक संघाचे सचिव सुनील भामरे, अध्यक्ष मिलिंद वाघ, प्रवक्ता गोपाळ पवार, कोषाध्यक्ष संजय जाधव, सहविद्यासचिव दिनेश बिरारीस, उपाध्यक्ष रविंद्र वाघ, मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक यांनी परिश्रम घेतले.