नवापूरात संभाजी महाराजांची 360 वी जयंती साजरी

0

नवापुर। शहरात राजे गृप आयोजित धर्मवीर संभाजी महाराज यांच्या 360 व्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी मोटार सायकल रँली संध्याकाळी 5 वाजता दत्त मंदिरा पासुन काढण्यात आली होती. त्यानंतर दि 6 जुन रोजी महादेव गल्लीत सकाळी 10 वाजता प्रतिमा पुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात धर्मवीर संभाजी महाराज यांचा प्रतिमेचे पुजन आदिवासी सहकारी साखर कारखाण्याचे चेअरमन शिरीष नाईक, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील, न.पा विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक अजय पाटील, शिरीष प्रजापत, नगसेविका रीना पाटील, मेद्या जाधव, सुशिला अहिरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश वडनेरे, जिल्हा कार्यवाहक रा.स्व.सं.चे राजु गावीत, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शरद पाटील, हेमंत जाधव,दर्शन पाटील, कविता पिसे,समिर दलाल, यांनी केले.

यावेळी चेअरमन शिरीष नाईक व हंसमुख पाटील, राजु गावीत यांनी राजे धर्मवीर संभाजी महाराज यांचा विषयी मार्गदर्शन केले. या सुत्रसंचालन अनिल सोनार यांनी केले. या नंतर सकाळी11 वाजता नवापुर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या वेळी राजे ग्रुप चे सर्व अध्यक्ष सदस्य उपस्थित होते. दुपारी 12 वाजता शहरातील आशापुरी मंदिर परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात जि.प अध्यक्षा रजनी नाईक, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक अजय पाटील, भाजपाचे समिर दलाल, मनोज मावची, भावीन आतारकर,पवन माळी, विशाल पिसे आदीनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. संध्याकाळी 5 वाजता धर्मवीर संभाजी महाराज यांची भव्य शोभा यात्रा महादेव गल्ली पासुन सुरुवात करण्यात आली. यावेळी ढोल ताशाचा गजरात शोभा यात्रा काढण्यात आली. संभाजी महाराज यांची प्रतिमा ट्रँक्टर टोलीवर ठेऊन विद्युत रोशनाई करण्यात आली होती.यशस्वीतेसाठी राजे ग्रुपचे विशाल पिसे,चेतन वाघ,पंकज वाघ,राहुल सोनार,पंकज सुर्यवंशी,किरण जोशी,राम पाटील,राकेश साठे,सनि पाटील,हेमंत देसाई,राजु माळी,संतोष गोसावी,दिपक मोरे,निमेश प्रजापत,मयुर पिसे,वैभव सोनार,गोपाल गिरासे,अविनाश पिसे,जयेस पिसे,प्रदिप पाटील आदीनी कामकाज पाहिले.