नवापुर। नवापुर शहरातील हॉटेलमध्ये फिल्टर पाण्याची व्यवस्था करावी बाबतचे निवेदन आंतराष्ट्रीय मानवाधिकार समिती तर्फे न.पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे यांना देण्यात आले आहे. त्यांनी निवेदनामध्ये म्हटले की, नवापुर शहरातील जे हॉटेल सुरु आहे. त्या हॉटेल्समध्ये खराब पाण्याचा वापर केला जात असुन नवापुर शहरातील नागरिकांच्या जिवनास धोक्कादायक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हॉटेल मालकांवर दंडात्मक कारवाईची मागणी
पाणी हेंड पंपाचे व रंगावलीनदीचे गढुळ पाणी आणुन हॉटेलमध्ये वापर केला जातो. तेच पाणी नागरिकांना सुध्दा पाजले जाते. अश्या खराब पाण्यापासुन मलेरिया, डायरिया, मुतखडा इत्यादी आजारांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. शहरात चालणार्या हॉटेल मालकांवर फिल्टर पाणी देण्याची सक्ती करण्यात यावी. तसे न केल्यास हॉटेल मालकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्याधिकारी यांना करण्यात आली.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्या
मुख्याधिकार्यांनी नवापुर शहरातील हॉटेलधारकांना सूचना द्यावी की त्यांनी फिल्टर पाणी देण्याची व्यवस्था करावी जेणे करुन नवापुर शहरातील नागरीकांना कोणत्याही प्रकारचे रोग होणार नाही. निवेदनावर समितीचे अध्यक्ष रमेश गावीत,संदिप मराठे,अजित गावीत,अॅड अरुण वळवी,नितीन समशेर, राजु गावीत,भटेसिंग नाईक,सुनिल गावीत,आदीचा सह्या आहेत.