नवापूर। कोरोनाच्या प्रादूर्भाव होऊ नये यासाठी नवापूर शहरातील भाजीपाला बाजार रंगावली नदीकिनारी स्थलांतर करण्यात आला आहे. सोशल डिस्टन ठेवून भाजीपाला विक्रीचे दुकान नेमून देण्यात आले आहेत. असे असताना रंगावली नदीकिनारी असलेल्या शनिवारच्या आठवडे बाजारात लोकांनी सोशल डिस्टन्स न ठेवता लोक भाजीपाला विक्री व खरेदी करताना दिसून आले. नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडे बाजार बंद करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून याच ठिकाणी भाजीपाला बाजार भरण्यात आलेला आहे. भाजीपाला विक्रेते खरेदी करणाऱ्यांनी काहींनी मास्क घातलेले नाही. होणारी मोठी गर्दी ही कोविड- 19 कोरोनाच्या आजारात संदर्भात धोकेदायक आहे. देशात राज्यात कोरोनाची आकडेवारीही हजाराच्या घरात गेल्याने चिंताजनक बाब असताना देखील बेफिकीरीने भाजीपाला मार्केटमध्ये लोक खरेदी करतांना दिसून आले. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासनाने वारंवार सूचना देऊन देखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत मध्ये नाही. अशावेळी सोशल डिस्टन्स ठेवा, मास्क घाला, सॅनिटाझरचा वापर करा, हात स्वच्छ धुवा, घरातच रहा घराबाहेर निघू नका, असे आवाहन वारवार केले जात आहे.