नवापूर: देशात व राज्यात विषाणूचा संसर्ग वाढत आहे. नवापूर या आदिवासीबहुल तालुक्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला आहे किंवा नाही याची प्राथमिक तपासणी करणारे इन्फ्रारेड थर्मस स्कॅनरच आरोग्य यंत्रणेला अद्याप उपलब्ध झाले नसल्याने याबाबत आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकाला, वैद्यकीय पथकाला, पोलिसांना, महसूल विभाग व या कामाशी जोडलेल्या आवश्यक घटकांना प्रर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट अद्याप मिळालेली नाही त्यामुळे तपासणी कशी करायची हा प्रश्न उपस्थित होत आहे.ही यंत्रणा जीव धोक्यात टाकुन कर्तव्य बजावुन आपली काळजी घेत आहे.
कोरणा संदर्भात आवश्यक साधनसामग्री लवकर मिळावी यासाठी आमदार शिरीष कुमार नाईक हे प्रयत्नशील आहेत तसे पत्र ही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आहे. मग असे असताना प्रशासन अत्यावश्यक साधन सामग्री लवकर का उपलब्ध करून देत नाही.हा प्रश्न पडला आहे.गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे व अत्यावश्यक गरजा तात्काळ उपलब्ध करून झाल्यास आरोग्य विभागाला काम करणे सोपे जाणार आहे.
नवापूर तालुक्यात तालुका आरोग्य विभाग ,पोलिस प्रशासन महसूल विभाग व त्या संबंधित सर्व यंत्रणा चांगले काम करत असून दक्ष आहे मात्र विदेशातून अथवा परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करणारे इन्फ्रारेड थर्मल स्केनरची मागणी सुरुवातीपासून असूनही ती अद्याप प्रतीक्षेत आहे .त्यामुळे तपासणीला अडथळा येत आहे.स्वतःच्या सुरक्षांसाठी पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची अत्यावश्यक गरज आहे ती सुद्धा उपलब्ध होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .कोरोणा विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रात्रंदिवस २४ तास जी यंत्रणा काम करते आहे या सर्वांना प्रर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट ची गरज आहे ती पूर्ण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.अत्यावश्यक गरजा नसल्याने संबधीत यंत्रणेत असंतोष पसरला आहे.