नवापूर । शहराजवळील एमआयडीसी येथे शुक्रवारी 1 लाखाच्या भंगाराची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. नवापूर शहराजवळील लहान चिंचपाडा येथे एमआयडीसी आहे. येथील भागात डी.टेक्स कंपनी आहे. या कंपनीत कपडे बनविण्याचे कामहोते. या कंपनीची मागील भागाची भिंत फोडुन अज्ञात चोरांनी 1 लाखाचे भंगार चोरुन नेले आहे. या बाबतीची फिर्याद कंपनीचे मालक प्रदीप पोतदार यांनी दिली आहे. मागे 10 दिवसापुर्वी देखील येथून 10 हजारच्या भंगाराची चोरी झाली होती.
वारंवार चोरीच्या घटना होऊन देखील त्यांचा तपास अद्याप लागला नाही. ही घटना ताजी असतानाच 1 लाखाचे भंगाराची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे येथे काम करणारे गुजरात राज्यातील व्यापारी हे धास्तावले आहेत. तसेच या कंपनीच्या लोकांनी दोन संशयतांना पकडून ताब्यात दिले आहे. या परिसरात व शहरात भंगार चोर कार्यरत असल्याची चर्चा होत आहे. निरंतर घडणार्या चोरीच्या घटना पाहता पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? असा सवाल नागरिक आणि व्यापारी करत आहेत.