नवापूर तहसील कार्यालयाला मिळाली बोट

0

नवापूर – आज नवापूर तालुक्यातील चौकी या गावात जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कलशेटी यांनी अतिवृष्टी झालेल्या तालुक्यातील गावांना भेटी देऊन पहाणी केली. वाघळापाडा येथे पुराचा पाण्यात वाहुन गेलेले काशिराम बाप्पजी गावीत यांचा नातेवाईकांना भेट देऊन सांत्वन केले. नैसगीक आपती उदभवल्यास पूर परीस्थिती आल्यास शासकीय बोटीचा उपयोग व्हावा, यासाठी नवापूर तहसील कार्यालयास बोट देण्यात आली. त्या बोटीचे प्रात्यक्षिक आज नागझरी धरणात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कल्लशेटी, तहसिलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत, पं.स उपसभापती दिलीप गावीत, पं.स सदस्य जालमसिंग गावीत, सरपंच रामकु गावीत, सुभाष गावीत, पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम, किशोर पेटकर, प्रितम आप्पा, आदी उपस्थित होते.तसेच या बाबत सर्व तहसिल कार्यालयाचा कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन सुचना देण्यात आल्या तसेच पुर्ण धरणाची पण पहाणी या बोटी व्दारे जिल्हाधिकारी यांनी केली. नवापूर तालुक्यात महापूरा मुळे अंदाजे 2 कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला.