नवापूर । नवापूर पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित सर्व शिक्षा अभियान व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नवापूर तालुकास्तरीय शिक्षणाची वारी तथा शैक्षणिक मेळावा श्री शिवाजी हायस्कुलचा मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.शिक्षणाची वारी या कार्यक्रमासाठी भव्य मंडपात आयोजन करण्यात आले होते एकुण 19 स्टाँल लावण्यात आले होते. तर या कार्यक्रमात 252 शाळांनी सहभाग घेतला होता. वनिता विद्यालयाचा शाळेतील विद्यार्थीनींचा बँडपथकांने मान्यवरांचे वाजतगाजत प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले.
विद्यार्थ्यांचे मान्यवरांव्दारे कौतुक
यावेळी बी. एस. चौरे,निंबाजी नेरे, विजय गावीत,जेष्ठ शिक्षिका जयश्री भामरे,इंदुबाई चौरे यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार केला. यावेळी जि. प. मराठी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थानी हगणदारीमुक्त,तंबाखुमुक्त,नेत्रदान यावर नाटीका सादर केली. जिप अध्यक्षा व उपस्थित मान्यवरांनी नाटीक सादर करणार्या विद्यार्थाचे रोख बक्षीस देऊन कौतुक केले.
शिक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न
यावेळी जिप अध्यक्षा रजनी नाईक म्हणाल्या की, 100 टक्के शिक्षणासाठी व उपस्थितीसाठी शैक्षणिक मेळावा अतिशय महत्वाचा आहे. जिप शाळेची शैक्षणिक प्रगती होत आहे याला शिक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. शैक्षणिक विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीला त्यांचा कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी शैक्षणिक मेळावा महत्वाचा आहे.
स्टॉलची पहाणी
जिप अध्यक्षा रजनी नाईक व प्रमुख पाहुण्यांनी शैक्षणिक साहित्य लावण्यात आलेल्या पुर्ण 29 स्टाँलला भेट देऊन माहिती जाणुन घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवापूर पंचायत समिताचा शिक्षण विभागातील विक्रम गावीत,ललीत भामरे,रवी पवार,सतिष रायते,नितीन पाटील, प्रफुल वळवी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी आर बी चौरे यांनी तर सुत्रसंचलन व आभार सुनील भामरे यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
या जिप अध्यक्षा रजनी नाईक यांनी उद्घाटन दिपप्रज्वलन करुन केले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सविता गावीत तर प्रमुख पाहुणे म्हणुन पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत,नायब तहसीलदार बी. एस. पावरा, शिवाजी ठाकुर, गटशिक्षणाधिकारी आर. बी. चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी मगर, केंद्र प्रमुख रायते, श्री शिवाजी हायस्कुलचे प्राचार्य विनोदकुमार पाटील, उपमुख्याध्यापक भरत पाटील,पर्यवेक्षिका सावित्री पाडवी, उपस्थित होते.