नवापूर तालुक्यातील युवकाचा नागन प्रकल्पात बुडाल्याने मृत्यू
चितवी येथे पसरली शोककळा ः तिसर्या दिवशी सापडला मृतदेह
नवापूर : भरडू नागन मध्यम प्रकल्प धरणात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडाल्याने मृत्यू झाला. सुनील हिरालाल गावीत (35, चितवी) असे मयताचे नाव आहे. सुनील हा तरुण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी गेला असता पाण्यात बुडाल्याने त्याचा शोध सुरू असतानाच तिसर्या दिवशी मृतदेह आढळला.
मासेमारी करताना धरणात बुडाला तरुण
नवापूर तालुक्यातील भरडू येथील नागन मध्यम प्रकल्प धरणात गुरुवार, 7 एप्रिल गुरुवारी दोन वाजेच्या सुमारास चितवी येथील सुनील हिरालाल गावीत (35) हा मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी गेला असता पाण्यात बुडाला. धरणाच्या पाण्यात स्थानिक गावकरी व त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता तो मिळून आला नाही. लागलीच विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश येलवे, विश्वनाथ नाईक, लिनेश पाडवी यांच्यासह पोलीस अंमलदार यांनी गुरुवार, 7 एप्रिल सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये शेवाळ व वेली असल्यामुळे त्या ठिकाणी शोध कार्य घेण्यासाठी मोठे अडथळे आले.
अखेर तिसर्या दिवशी सापडला मृतदेह
तिसर्या दिवशी सकाळी सुनील गावित या तरुणाचा मृतदेह पाण्यात वर आल्यावर स्थानिक नागिाी व पोलीस प्रशासनामार्फत तो बाहेर काढून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. चितवी येथील मयत सुनील गावीत यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.