जि.प अध्यक्षा रजनी नाईक यांचा हस्ते उद्घाटन
तालुक्यातील चिंचपाडा प्राथमिक शाळेपासून लसिकरणास सुरूवात
नवापूर- नवापूर तालुक्यातील चिंचपाडा प्राथमिक शाळा येथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन एक गोवर- रुबेला लस, करते दोन आजारांवर मात या अंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांसाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेचे उद्घाटन जि.प अध्यक्षा सौ रजनी नाईक यांचा हस्ते करण्यात आले यावेळी पं.स.सभापती सविता गावीत, उपसभापती दिलीप गावीत,पं.स सदस्य जालमसिंग गावीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितिन बोडके, डॉ.निलेश विभुते, चिंचपाडा सरपंच नम्रता वळवी, नवापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हरीचंद्र कोकणी, गटशिक्षण अधिकारी आर.बी.चौरे, मुख्याध्यापीका सुमिञा गावीत, वैद्यकिय अधिकारी जे.बी.सुर्यवंशी, बी.बी.विहीर, दिनेश वानखेडे आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी रूबेला लसिकरणाविषयी केले मार्गदर्शन
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचा प्रतिमेचे पुजन करुन व दिपप्रज्वलन करुन उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा सत्कार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हरीचंद्र कोकणी यांनी केला. यानंतर डॉ.कोकणी म्हणाले की, हा कार्यक्रम 27 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत संपुर्ण तालुक्यात सर्व शाळा, आरोग्य संस्था असे एकुण 1 हजार 129 सत्रांमध्ये 80 हजार 662 लाभार्थीना दिलेल्या लोकसंख्याचे 27.33 टक्के नुसार लसीकरण पुर्ण करुन घेण्यात येणार आहे. या नंतर जि.प अध्यक्षा सौ रजनी नाईक म्हणाल्या की नंदुरबार जिल्हा हा कुपोषणग्रस्त हा कलंक मिटवायचा आहे.या साठी सर्वाचे योगदान लागणार आहे.रुबेला लसीकरण करतांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.या बाबत काही माहीती लागल्यास तालुका आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवीका व आशा वर्कर यांचाशी संर्पक साधावा व ही मोहीम 100 टक्के यशस्वी करावी अशी आशा बाळकते असे सांगितले
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम प्रमाणपत्र विद्यार्थीना जि.प अध्यक्षा रजनी नाईक, पं.स.सभापती सविता गावीत, उपसभापती दिलीप गावीत, पं.स. सदस्य जालमसिंग गावीत यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ हरीचंद्र कोकणी यांनी केले तर आभार डॉ जे.बी.सुर्यवंशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी दिनेश वानखेडे, व्ही.बी.विहीर, आनंद सोनवणे,सह सर्व आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व शिक्षण विभागाचे तालुका कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
रनाळे येथे गोवर रुबेला लसीकरणावर मार्गदर्शन
नंदुरबार – तालुक्यातील रनाळे प्राथमिक आरोग्य केंद्र शनिमांडलतर्फे जि.प.कन्या शाळेत 27 नोव्हेंबर रोजी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे उदघाटन करुन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख दीपक गवते तसेच रनाळे ग्रा.पं.च्या सरपंच तृष्णाताई गवते यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दिपक गवते यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात गोवर रुबेला या आजारांपासून होणार्या समस्यांबाबत माहिती देऊन गावात जनजागृती केल्याबद्दल शिक्षक वृंद व आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले. यावेळी प्रा.आ. केंद्र शनिमांडलचे वैद्यकीय अधिकारी मनोज गावित, आरोग्य सहाय्यक जाधव, अमृत पाटील, रमेश तांबोळी आदी उपस्थित होते.