नवापूर नगरपरिषदेत प्रजापिता ब्रह्मकुमारीतर्फे रक्षाबंधन

0

नवापुर । नवापुर नगरपरिषद येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीतर्फे रक्षाबंधन निमित्त नगराध्यक्षासह कर्मचार्‍यांना राखी बांधण्यात आली. यात नगराध्यक्षा रेणुका गावीत,नगरसेवक चंद्रकांत नगराळे, मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे, कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे,आरोग्य निरीक्षक भरत पाटील, प्रकल्प अधिकारी प्रशांत भट, बांधकाम विभागाचे अभियंता सुधिर माळी ,वसुली विभागाचे परशुराम ठाकरे, अंनत पाटील,वामन अहिरे, राजु गावीत,किसन वाडेकर, राजेंद्र चव्हाण,यांना संध्या दिदी,जीली दिदी यांनी राखी बांधल्या. यावेळी संध्या दीदी यांनी मार्गदर्शन केले.

जीवनात चांगले कर्म करा
यावेळी प्रजापिता बम्हकुमारीच्या संध्या दीदी म्हणाल्या की, मानवाने आपल्या जिवनातील कमीत कमी एक तास परमेश्वराचा भक्तीसाठी वेळ दिला पाहीजे. आपले आचारण नेहमी शुध्द ठेवावे. यामुळे आपल्या जिवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक होते. मनुष्य जन्म मानवाला पुन्हा मिळेल याची शाश्वती नसते. या जीवनात आपले कर्म शुध्द असावे. जेणेकरुन त्यांचा लाभ इतरांना चांगल्या प्रकारे मिळतो. या जिवनात कर्माचा सिध्दांत सांगतो की, कुठले ही कर्म वाईट किवा चांगल याचे फळ हे आपल्या कर्मावर अवलबुन असते. जिवनात नेहमी चांगले कर्म करा इतर काय करतात त्यापेक्षा आपण काय करतो, काय करावे याचा विचार नेहमी केला तर आपण नेहमी आनंदी व सुखी रहाल. कर्म करत ते ही सत्याने तर त्याचे फळ नक्कीच मिळते असे सांगितले यावेळी नवापुर नगरपालिकेतील सर्व कर्मचार्‍यांना राख्या बांधण्यात आल्यात.