नवापूर नगरपालिकातर्फे नाला सुधारणा कामांचा शुभारंभ

0

नवापुर । नवापूर नगर पालिकेतर्फे दलित वस्ती सूधार कार्यक्रमा अंतर्गत शाह झेरॉक्स ते भोई समाज मंदिरापासून राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा 27 लाख 93 हजार 340 खर्चाचा नाला सूधारणा कामाचा शुभारंभ माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत व आदिवासी सहकारी साखर कारखान्या चेअरमन शिरीष नाईक, शेतकरी संघाचे अध्यक्ष अजित नाईक, नगराध्यक्षा रेणुका गावीत, उपाध्यक्ष हारुण खाटीक यांच्याहस्ते करण्यात आले.

विकासात भर पडणार
या कामामुळे स्वच्छतेमध्ये भर पडणार आहे. तसेच होणारे अतिक्रणाला आळा बसणार असून हा नाला शहराचा मध्यभागात आहे. नाल्याच्या आजु बाजुला स्वरक्षण भिंत येणार आहे यामुळे नवापुर शहराचा विकास कामात भर पडणार आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक आरीफ पालावाला, आयुब बलेसरीया, अजय पाटील, चंद्रकात नगराळे, आशिष मावची, शिरीष प्रजापत, मेघा जाधव, ज्योती जयस्वाल, रिना पाटील, सुशिला अहिरे, रजीला गावीत, माजी नगरसेवक विनय गावीत, सामाजिक कार्यकर्ता हेमंत जाधव, जयनु गावीत, शरद पाटील, जेष्ठ कार्यकर्ता बच्चु सैय्यद, जी.के.पठाण, बांधकाम अभियंता सुधिर माळी, राजेंद्र चव्हाण, कार्तीक अरुणा चलम आदी उपस्थित होते.