काही महिन्यानी होणार्या नवापूर नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून गेल्या काही महिन्यांपासुन सर्वच पक्षांनी नगराध्यक्ष पदाचा सर्वसाधारण महिला उमेदवारांचा शोध घेऊन चाचपणी सुरू केली आहे. काही विद्यमान नगरसेवक आपल्या पत्नीला नगराध्यक्षपदाचा उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यासाठी त्यांनी योजना आखल्या आहेत.नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी शेकडो जण अनेक वर्षोंपासून सेवाभावी कामे करत आले आहेत.सत्ताधारी काँग्रेस गटात मात्र सध्या तरी शांतता आहे. माञ या उलट सत्ताधारी काँग्रेस व इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी आगामी नगरपालिका निवडणुकीत तीसरी आघाडी उतरणार असल्याचे दिसत आहे. मात्र एकमत कोणाचेही झाले नव्हते, चर्चा चांगलीच रंगली होती तर या बैठकीस सर्वाना स्वादिष्ट भोजन ही देण्यात आले होते. ही बैठक म्हणजे तीसरी आघाडीची एक खेळी व चाचपणी असल्याचे बोलले जाते. सध्या तरी आगामी निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपा-शिवसेना एकञ येऊन लढली पाहिजे. अद्याप एकमत झाले नसल्याचे बोलले जात आहे. मागच्या निवडणुकीत भाजप शिवसेना स्वतंत्र लढल्यामुळे दोघांचे नुकसान झाले.याचा फायदा काँग्रेसला झाला. यावेळी भाजपा सेना युतीने निवडणूक लढेल असे दिसते, शेवटी चर्चा यशस्वी होईल असा दावा केला जात आहे. आगामी नगरपालिका निवडणुक काटे की टक्कर असणार असल्याचे बोलले जात आहे .मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची सत्ता होती. कै.गोविंदराव वसावे हे थेट जनतेतुन निवडून नगराध्यक्ष झाले होते.राष्ट्रवादी पक्षाची सत्ता स्थापन नगर पालिकेत यापुर्वी झाली आहे.नवापूरकरांनी एक पर्याय त्यावेळी दिला होता. हा काळ वगळता नगरपालिकेत आतापर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता राहीली आहे.माजी आमदार शरद गावित यांना ही नगर पालिकेत राष्ट्रवादी उमेदवार निवडून आणण्याची किमया करून दाखवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष निवडणूक रिंगणात उतरून लढत देईल असे चित्र दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपा व शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी शहरातील अनेक समस्या व प्रश्न, विकास कामे यावर आंदोलने व उपोषण करून विरोध दर्शविला आहे. देशात व राज्यात भाजपाची सत्ता असली तरी नवापूर येथे जेष्ठ नेते आ.सुरूपसिंग नाईक व माजी केंद्रीय गृहराज्यमंञी माणिकराव गावित यांची पकड आज ही मजबूत आहे.अनेक विकास कामे करून त्यांनी शहरासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच शरद गावित यांनी ही आमदार असताना शहरात अनेक विकास कामे केली आहेत. आता आगामी नगर पालिका निवडणुकीत खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावित सत्ता मिळविण्यासाठी काय काय रणनीति तयार करतात हे लवकरच दिसुन येणार आहे.आतापर्यंत विरोधी पक्षांना एक अपवाद वगळता नगर पालिकेत यश येऊ शकलेले नाही.गोविंदराव वसावे यांच्या नंतर कट्टर व अभ्यासु व सत्ताधारीना टक्कर देणारे विरोधक नेतृत्व अद्याप तयार झालेले नाही.त्यामुळे नवापूरकर ते शोधत आहेत. त्यांना पर्याय हवा आहे सत्ताधारी काँग्रेस गटाने शहरात काही विकासकामे केली आहेत. शहरातील रस्ते, पूल, नाना नानी पार्क तसेच विकास निधीतून अनेक कामे केली आहेत. त्या जोरावर काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीसाठी समोर जाणार आहे. नाला बांधकाम, सराफ गल्लीतील 20 लाखांचा निकृष्ट दर्जाच्या वादग्रस्त डांबरी रस्ता,जलशुध्दीकरण केद्र,शहरातील घाणीचे साम्राज्य, गंभीर वाहतूक समस्या,रंगावली नदी खोलीकरणांचा विरोध, विकास कामे, अशा अनेक मुद्यांवर आगामी नगर पालिका निवडणुकीत भाजप सेना, राष्ट्रवादी,तिसरी आघाडी, काँग्रेस गटाला अडचणी आणतील असे दिसते. त्यासाठी सक्षम नेतृत्व, प्रखर विरोध होण्याची गरज आहे. सध्या तरी शेकडो भावी नगरसेवक आगामी निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून मतांसाठी प्रत्येक सामाजिक कामात, सुख दुखात, लहान मोठ्या, गरीब श्रीमंत लोकांचा वाढदिवसाला हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. शेवटी एकच.. मतदार राजा आता खुला विरोध करत नाही तर तो मतदान मशीनवर बटन दाबून करत असतो.असो सध्या तरी पाऊस जोरदार बरसत आहे.त्यामुळे सर्वञ गारवा आहे. तिसरी आघाडीची गरम गरम चर्चा, उपनगराध्य राजीनामा देणार असल्याचे सामाजिक माध्यमांवर चर्चा सुरू आहे ती पोस्ट व विकामकामांचे उपस्थित होणारे मुद्दे यावर चर्चा रंगत आहे.
हेमंत पाटील, नवापूर- 9823610627