नवापूर नगरपालिकेची विषय समितीची निवड 

0

नवापूर : नवापूर नगरपालिकेची विषय समितीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार प्रमोद वसावे व परीविक्षाधीन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी काम पाहिले. व्यासपीठावर नगराध्यक्षा रेणुका गावीत, मुख्याधिकारी प्रतिभा पाटील उपस्थित होते. अय्युब मोहम्मद बलेसरीया यांची सार्वजनिक बांधकाम समिती सभापती म्हणून, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी अजय पाटील,नियोजन व विकास समिती सभापतीपदी खाटीक हारूण शब्बीर यांची निवड करण्यात आली.

पाणीपुरवठा व जलनिस्सरण समिती सभापतीपदी शेख सईदा आरीफ यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अनिता मावची यांची निवड करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार प्रमोद वसावे यांनी नवनियुक्त विषय समिती सभापतींचा सत्कार केला. या विषय समिती निवडणूक प्रक्रियेत कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, वामन अहिरे किसन वाडेकर यांनी परीश्रम घेतले.