नवापूर । मुंबई चौपाटीचा धर्तीवर शहरातील गजबजलेल्या कॉलेज रोडवर नगर पालिकेने लहान आकाराचा पतर्याच्या टपर्या (दुकाने) उभी केली आहेत. नुकताच या टपर्यांचा जाहीर लिलाव करण्यात आला. शहराचा विकास व सुंदरतेसाठी तसेच पालिकेचा आर्थिक उत्पनात वाढ व्हावी यासाठी ही दुकाने उभी केली आहेत. बेरोजगारांना या माध्यमातून काम मिळणार आहे. शहरातील कॉलेज रोड म्हणुन ओळखल्या जाणार्या या रस्त्यावर रोज गर्दी असते. सायंकाळी कोणी देवदर्शन तर कोणी फिरणारे तसेच शतपावलीसाठी लोक येत जात असता. जणु काही येथे जत्राच भरते. बॅक, मंदिर, शाळा, दवाखाने भागात असल्याने या लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात.
आठ बाय आठ आकाराचे दुकान
ही दुकाने (शॉप) ची साईज ही 8 बाय 8 या आकाराची आहेत या दुकानाचा लिलाव नुकताच पालिकेने केला आहे. या दुकानामुळे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच पालिकेचे उत्पन्न वाढुन शहराचा विकासात भर पडली आहे. या लिलावात पूर्णता स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. या दुकानांमुळे या परिसरात मुंबई चा चौपटीचे चित्र दुकाने सुरू झाल्यानंतर दिसणार आहे.
मुंबईपेक्षा महाग दुकाने
एकुण 26 दुकाने असून यात पहिली दूकान अपंगांसाठी राखीव आहेत. या दुकांनांच्या लिलावातून एकुण 90 लाख रूपये नगर पालिकेला प्राप्त झाले आहे. जे खरोखर गरजू भेळपुरी पाणीपुरी वाले होते त्यांनी जाहीर लिलावात 2 लाखापर्यंत बोली केली. बोली वाढत असल्याने त्यांनी जाहीर लिलावातून काढता पाय घेतला. मुंबई व गुजरात पेक्षा ही नवापूर शहरातील दुकानाचा किंमत झाल्या आहेत. तरी लोक ती घेऊन प्रोपर्टी करून घेतांना दिसतात.
पालिकेला मिळणार उत्पन्न
या भागात येणार्यांमध्ये शहरासह ग्रामीण भागातील आदिवासी बांधव त्यात युवकांच्या मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. नागरिक चाट, भेळपुरी, पाणी पुरी, वडापाव आईस्क्रीम, सोडा आदी चटपटी खाद्यपदार्थांचे विविध लोटगाड्या व स्टॉलवर जाऊन खाण्याचा आनंद घेतात. संध्याकाळी येथे मोठी गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन नगर पालिकेने याच ठिकाणी नवापूरकर जनतेला नवनवीन चाऊ माऊचा स्वाद घेता यावा म्हणून पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळेल यासाठी याठिकाणी पत्र्याचा शेडची आकर्षक 26 दुकाने तयार केली आहेत.