नवापूर। सहसा पत्रकार म्हणजे अतिशय चिकित्सक व दुसर्यांच्या उणिवा शोधणारे अशी एक सर्वसामान्य ओळख सांगितली जाते मात्र रंगावली मध्यम प्रकल्प सारख्या मोठ्या धरणातून सलग दुसर्या वर्षी अनेक वर्षांपासून साठलेला गाळ काढण्याचा जो उपक्रम लोकसहभागातून नवापूर तालुका दैनिक पत्रकार संघ राबवित आहे तो केवळ कौतुकास्पदच नव्हे तर प्रेरणादायी ठरावा असाच असल्याचे गौरवोद्गार राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी काढले.
नवापूर तालुका दैनिक पत्रकार संघाचे वतीने शहरातील सर्व स्तरातील नागरिकांच्या सहकार्याने तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या रंगावली मध्यम धरण प्रकल्पातील गेल्या अनेक वर्षांपासून साठलेला गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी खा.डॉ. हिना गावित,माणिकराव गावित, जि.प.अध्यक्षा रजनी नाईक, भरत गावित, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सीईओ मंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, पं.स.सभापती सविता गावित, सरपंच रामकु गावित, नगराध्यक्षा रेणुका गावित, गटनेते गिरिश गावित, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, अजित नाईक, भाजपाचे अनिल वसावे, एजाज शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविक निलमकुमार पाठक यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. इद्रिस पठाण यांनी, तर आभार हेमंत पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी मंगेश येवले, महेंद्र चव्हाण, निलेश पाटील, प्रकाश खैरनार, प्रेमेंद्र पाटील, रविदास गावित व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.