नवापूर । येथे घरफोडीत चोरट्यांनी दोन सॅमसंग कंपनीचे 19 हजार रूपये किंमतींचे मोबाईल 2016 साली लंपास केले होते. या घरफोडीचा गुन्हा नवापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. याबाबत स्थानीक गुन्हा शाखेने तांत्रीक माहितीच्या आधारे नारायणपुर रोड येथील विक्की प्रकाश गोसावी यास पकडून नवापूर पोलीसांच्या ताब्यात दिले होते. पुढील तपासात गढी परिसारतील प्रितेश अश्विन जयस्वाल व तीनटेंबा येथील राहुल उर्फ जग्गु गोसावी यांना अटक करण्यात आली. तीघ चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा 7 हजार 500 रूपये किंमतींचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. तीघ आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत.
गुन्ह्यातील मोटरसायकल हस्तगत
भाईलालभाई शिवराम पटेल हे जळगावचे रहिवाशी अंगडीयाचे 2 लाख रूपये 24 एप्रिल 2017 रोजी घेवून जळगाव येथून महिदरपुरा, सुरत येथे ट्रव्हलमध्ये जात होते. यावेळी नवाबखान गुलाबखान व मोहम्मद मुदनशिर आलमशेख (दोघ रा. जळगाव) व त्यांच्या दोन साथीदारांनी नवापूर ठाणे हद्दीतील चिंचपाडा रेल्वेगेटजवळ ट्रव्हल थांबवून भाईलालभाई पटेल यांना ट्रव्हलमधून खाली उतरवून 3 ते 4 किमी लांब घेवून जावून एका शेतात इलेक्ट्रीक पोलला बांधून पसार झाले होते. त्यांना गुन्ह्याचे तपासात अटक केली असून आरोपी पो.क. रिमांडमध्ये असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थागुअशा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, पोलीस उपनिरीक्षक बबन सुर्यवंशी, पोहेकॉ महेंद्र नगराळे, पोना अनिल राठोड, पोना रितेश इंदवे व इतर कर्मचारी करीत आहेत.