नवापूर पोलीसांतर्फे शहरात रूट मार्च

0

नवापुर । नवापुर पोलिस स्टेशन मार्फत गणेश उत्सव, बकरी ईद,या सनानिमित्त पोलिसानी नवापुर शहरात रुटमार्च संचलन केले. यावेळी 6 पोलील अधिकारी ,पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा,दिपक पाटील, संतोष भंडारे,ताथु निकम,संगिता कदमसह 30 पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

गणेश, बकरी ईद व येणार्‍या सणासुदीनिमित्त शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन शहरातील लाईट बाजार,लिमडावाडी,गांधी पुतळा,कुंभारवाडा,शिवाजी रोड,गुजर गल्ली,आंबेडकर चौक,सरदार चौक,मेनरोड,आंबेडकर पुतळा,नारायपुर रोड बस स्थान परीसर( रुट मार्च) संचलन करुन नवापुर पोलिस स्टेशन आवारात सांगता करण्यात आली.