नवापूर मर्कन्टाईल बँकेची १९ वी सर्वसाधारण सभा उत्साहात

0

संचालक अनिल पाटील यांची मुख्याध्यापकपदी निरुक्ती झाल्याने अभिनंदन

उत्तम कर्जदारांचा सत्कार ; स्व. गोंविदराव वसावे यांच्या कार्याचा गौरव

नवापूर । येथील मर्कन्टाईल को.ऑप.बँक लि.नवापूरची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन बँकेच्या चेअरमन सरला गोविंदराव वसावे यांच्या अध्यक्षतेखाली व बँकेचे पदाधिकारी व सभासदांच्या उपस्थीतीत येथील गांधी पुतळ्याजवळील हनुमान मंदिर हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या वेळी चेअरमन सरला वसावे, व्हा.चेअरमन जीतेंद्र देसाई, ज्येष्ठ संचालक व प्राचार्य अनिल सुदाम पाटिल, नंदकिशोर काशिनाथ थोरात, डॉ.सुनिल पाटिल, शिवाजी गावीत, डॉ.जी.एम.वळवी, चंद्रशेखर बेंद्रे , विनय वसावे , मुरलीधर सोनार , हेमंत शाह , चंद्रकांत सोनार , मरियमबी ताई आदि व्यासपीठावर उपस्थीत होते.

विविध विषरांवर चर्चा
ज्येष्ठ संचालक अनिल पाटिल यांची श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविदयालयाच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबददल व्हा.चेअरमन जितेंद्र देसाई व मरियम ताई आदिच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर सभेला सुरूवात करतांना ज्येष्ठ संचालक अनिल पाटिल यांनी बँक यांनी विविध विषयांवर चर्चा करून ते सभासदांकडून मंजुर करण्यात आले.

प्रगतीची माहिती दिली
नुतन संचालक हेमंत शाह, चंद्रकांत सोनार , सौ.मरियम ताई यांचा सत्कार करून त्यांचा अनुभवाचा बँकेला निश्‍चितच फायदा होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला . रानंतर व्हा.चेअरमन जितेंद्र देसाई यांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्व.गोविंदराव वसावे यांनी आठवण करून साहेबांचे कार्य अनमोल असून त्यांनी लावलेले रोपटे मोठे होत आहे हि एक बँकेची प्रगती असून तीला आपल्या सहकार्याची अवश्यकता आहे असे सांगत जुन्या आठवणीना उजाळा दिला.

यांची होती उपस्थिती
पत्रकार मंगेश येवले यांनी बँकेचा प्रगतीला शुभेच्छा देऊन स्व .वसावे साहेबांचे स्मरण केले. यावेळी उत्तम कर्जदार सुरेखा अहिरे, सुनिता सोनवणे, डॉ.अनिल मावची , डॉ.शशिकांत पाटिल , संदिप पारेख , सतीष वळवी , स्वप्नील सोनार, भावेश खैरनार , क्रुष्णा खैरनार , शिरिष प्रजापत , संजय बागले , गजेंद्र सुर्यवंशी , अनिल पाटिल आदिंचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन चंद्रकांत बेंद्रे यांनी तर अहवाल वाचन संजय शिंदे यांनी केले.