नवापूर येथील उघड्या फ्युज पेटीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका

0

नवापूर। शहरात उघड्या फ्युज पेटीमुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. काही अपघात होण्या आधीच नवापूर येथील वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील तलाठी कार्यालय शास्त्रीनगर रस्त्यावर जनता पार्क मंगलदास पार्क,नारायणपूर रोड आदि भागात फ्युज पेट्या नेहमी उघड्या असतात. तर काही फ्युज पेट्याची दुरावस्था झाली आहे. जीर्ण झालेल्या व पुर्णपणे उघड्या असलेल्या या फ्युज पेटीतील वायरिंगचे जाळे पसरले आहे. तलाठी कार्यालयाजवळील फ्युज पेटी वारंवार जळत असण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. शॉटसर्किटचे प्रकार ही वारंवार घडत असतात. अत्यंत धोकादायक असणार्‍या फ्युज पेटी परिसरातून विद्यार्थांचे येणे जाणे सुरू असते. लहान मुले या भागात खेळत असतांना मोठा अनर्थ होऊ शकतो या प्रकाराकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देऊन उघड्या फ्युज पेटी बंदिस्त कराव्यात अन्यथा या फ्युज पेटीना स्पर्श होऊन एखादा बळी गेल्यावर वीज वितरण कंपनी लक्ष देणार काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार
शहरातील विविध प्रभात उघड्या फ्युज पेट्या दिसुन येतात. या उघड्या फ्युज पेटीचा परिसरात लहान मुले खेळत असतात यातून कदाचित तसेच त्यांना अथवा पाळीव प्राणी ना जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अनेक नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी निवेदन तसेच प्रत्येक्ष भेटून ही बाब विज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही.