नवापूर येथील ओढा विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम

0

नवापूर। श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद वाघ तर प्रमुख अतिथी पर्यवेक्षक एम.जे. सोनवणे, ए.बी. थोरात, वरिष्ठ शिक्षक ए.डी. सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व प्रथम भरत सैंदाने यांनी आपल्या मनोगतातून रक्षाबंधनाचे प्राचीन काळापासून विविध दाखले देत बहिण भावाच्या पवित्र नात्याविषयी आपली जबाबदारी स्पष्ट केली. गणेश महाजन यांनी चंद्रग्रहण व नारळी पौर्णिमा या विषयी माहिती सांगितली.

या कार्यक्रमात भावांनी बहिणीच्या रक्षणाची प्रतिज्ञा घेतली. प्रास्ताविक एम.जे. सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन नारायण मराठे यांनी तर आभार दर्शन अग्रवाल यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.