नवापूर येथील महिला मंडळाचा पाणी बचतीचा अभिनव उपक्रम

0

नवापूर। पाण्याची बचत करा,पाणी वाचवा,पाण्याचे युध्द टाळा ,पाण्याचा गैरवापर करू नका पावसाळ्यातील पाणी वाचविण्यासाठी नवापूर तालुका महीला मंडळाने अनोखा उपक्रम हाती घेतला व त्याला योग्य प्रतिसाद मिळत आहे. शंकराचार्यांनी सांगितल्या प्रमाणे धर्मोदर्यस्रव काम श्वास किमते न सेवते अर्थात धर्मद्वारे अर्थ,काम,आणि मोक्ष मिळते त्याचे आचरण केले जाते त्याच प्रमाणे पाण्याची बचत केल्याने अध्यात्मीक,सामाजिक,कौटुंबीक फायदे होतात. आपण भूमातेपासून आपण फार काय घेतले असून तिला पाणी देऊन जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू या. आज एक एक हंडा पाण्यासाठी लोकांना इकडे तिकडे फिरावे लागते. एवढेच नव्हेतर शालेय विद्याथार्ंना सुध्दा पाण्यासाठी सुट्टीचा आनंद घेता येत नाही ही एक शोकांतीका आहे.

पाणी बोरिंगमध्ये जमा
आज शहरात जवळ – जवळ 30 ते 40 बोरिंग असून या बोरिंगामध्ये पावसाळ्याचे पाणी सरळ वाचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाणी जर सरळ बोरिंगात घेतले तर 151515=3375 घनफूट पाण्याचा साठा जमा होणार असून जवळ जवळ हे पा़णी 95 ,569 लिटर पाणी फक्त पहिल्या आठ दिवसाच्या पाण्यात जमा होणार असून बाकी पाणी किती जमा होउन फायदाच होणार आहे.

पाणी वाचवीण्यासाठी विविध प्रयोग
स्वाध्यायाचे प्रणेते प.पू.पांडूरंग शास्रीजी आठवले यांनी 25 वर्षापूर्वी कुवा रिचार्ज, बोरिंग रिचार्ज ,शोषखड्डा, निर्मल नीर सारखे प्रयोग पाणी वाचविण्यासाठी केले. आज हेच कार्य जयश्री दिदि करत असून त्यांचाच प्रेरणेने हे कार्य पुढे चालू आहे. शास्ञज्ञ देखील म्हणतात की पावसाळयाचे पाणी वाचविण्यात आले तर भविष्यात त्याचा फायदा नक्कीच होईल. आणि हीच प्रेरणा घेऊन मंडळाने शहरातील कुवा ,बोरिंग रिचार्ज चे काम हाती घेउन पाणी वाचविण्याचा प्रयत्न करित आहे.

फायदा सर्वांनाच
छताचे पाणी बोरिंगमध्ये जमा करण्यासाठी फक्त एकदाच 4 ते 5 हजार रू.खर्च होणार असून नंतर पाणी हे फूकटच मिळणार आहे. जर एक बोरिंग 1 लाख लिटर पाणी साठवू शकते तर 30,40 बोरिंगामध्ये किती पाणी जमा होईल आणि याचा फायदा सर्वानाच होईल. यात तिळमात्र शंका नसून खाजगी बोरिंग धारकांनी सदर काम करण्यासाठी महिला मंडळाचा पदाधिकारीना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.