नवापूर । येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त 21 जुन रोजी योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.पाटील, उपमुख्याध्यापक अनिल पाटील, उपप्राचार्य एस.आर.पहुरकर, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, विनोद पाटील, कमल कोकणी, श्रीकांत पाठक, प्रतिक पाठक उपस्थित होते. पतंजली योग योग समितीचे योग प्रचार प्रभारी वैद्य ज्ञानेश्वर पुराणीक यांनी उपस्थिनांना योग प्रकार, प्राणायाम, आसन याची प्रात्यक्षिके करून दाखवली. राजेंद्र साळुंके, दक्षा गावीत यांनी त्यांना सहकार्य केले प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक संगिता कदम, शिक्षण विस्तार अधिकारी चौरे, शिक्षण विभागाचे नेरे यांची यावेळी उपस्थित होती.