नवापूर येथील सार्वजनिक विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन

0

नवापूर। श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनीक मराठी हायस्कूल व ज्यु.कॉलेज नवापुर येथे विद्यार्थी शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्ष म्हणून हेमंत शाह उपस्थित होते. यावेळी बबनराव जगदाळे ,प्रा.एम.एस.वाघ, ए .बी. थोरात , विनायक गावीत व दिनकर गावीत उपस्थित होते .यानंतर शिक्षक सी.एस.पाटील व एम.ए.पाटील यानी मनोगत व्यक्त केले. हेमंत शाह यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात सातत्यपुर्वक प्रयत्न व चिकाटी ने अभ्यासातुन विदयार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवावा पाठिंबा दयावा असे सांगितले. सुत्रसंचालन एस.एस. खैरनार तर आभार आर .एम .भट यांनी मानले.