नवापूर येथून सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक रवाना

0

नवापूर । चलो बुलावा आया है, माताने बुलाया है जय माताजी जा जय घोषात सप्तश्रंगी मातेचा दर्शनासाठी नांदुरी गडाकडे रवाना झाले आहेत. पायी जाणार्‍या भाविकांनमध्ये यंदा वाढ झाली असून यात महिला युवतीची संख्या लक्षणीय आहे. रोज गटागटाने युवावर्ग पायी गडाकडे जातांना दिसत आहे. यामुळे प्रमुख रस्ते गर्दीने फुलले आहेत. नवापूर शहरातील गुज्जर गल्ली भागतील युवा वर्ग पायी सप्तशृंगी माताचा दर्शनासाठी रवाना झाला.

पायी जाणार्‍या भाविकांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग
यावेळी बहुद्देशीय सेवा समितीचे अध्यक्ष हिमांशु पाटील, राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष संजय राजपूत, नवलसिंग राजपूत, दर्शन पाटील यांनी पायी गडावर जाणार्‍या युवकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भटू मोरे, राकेश पाटील, भटु पाटील, योगेश पाटील, जयेश पाटील, पवन पाटील, कमलेश हिरे, अतुल तांबोळी, मदन पाटील, जिग्नेश पाटील, आशिष पाटील, आदी युवा उपस्थित होते. पायी जाणारे भाविक चरणमाळ-बफखेल मार्गाने गडावर पोहचतात. पदयात्री दरवर्षी चेवटीबारी साल्हेर अभोना मार्ग सप्तश्रृगी मातेचा गडाकडे मार्गस्थ होत असतात. दरवर्षी नांदुरी गडावर जाणार्‍या भाविकांचा ओघ पाहून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. साडेतीन पीठापैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तश्रृगी देवीची यात्रा उत्सवासाठी खान्देशातील अनेक जण पदयात्रेने वणी येथे जातात .नवापूर शहर व तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पायी गडावर जाण्याची संख्या वाढली आहे.