नवापूर येथे अन्नदिनानिमित्त धान्य वितरण

0

नवापूर । अन्न दिनानिमित्त नवापूर तहसील अंतर्गत तालूक्यातील स्वस्त धान्य दुकानात तहसीलदार प्रमोद वसावे यांचा उपस्थितीत लाभार्थीना शासननियमानुसार पॉस मशिनद्वारे धान्यचे वितरण करण्यात आले. शासनाचा आदेशानूसार दर महिन्याच्या सात तारखेस अन्नदिन घेण्यात येतो. ग्रामीण भागातील व शहरी भागातील मिळून चार पाच स्वस्त धान्य दुकानातून तहसीलदार यांच्या उपस्थितीत धान्यचे वितरण करण्यात येते. याप्रमाणे या महिन्यात तालूक्यातील थूवा विजापूर सहीत शहरातील महेंद्र रामदास चव्हाण यांच्या स्वस्त धान्य दुकानात अन्नदिना निमित्त ई पॉस मशिनद्वरे धान्य वितरण करण्यात आले.

तहसीलदार प्रमोद वसावे यांनी याप्रणालीद्वारे धान्य घेतांना ग्राहकांनी रेशनकार्ड आणले नसेल तरी बारकोड देऊन कूटूबांतील समाविष्ट सदस्यांचा अंगठा देऊन आधार रिडींगनूसार धान्य वितरण करण्यात येईल अशी माहिती उपस्थित लाभार्थीना दिली. प्रसंगी पूरवठा अव्वल कारकून मिलींद निकम धान्यवितरण अधिकारी सांळूखे, पूरवठा निरीक्षक आर. एम. गवळी, रमेश वळवी, सनी गावित व ग्राहक उपस्थितीत होते.