नवापूर येथे अपघात; तीघे गंभीर जखमी

0

नवापूर – नवापूर शहराजवळील हाँटेल गार्डन समोर महामार्गावर मोटारसायकल व क्रुझर यांचा भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. याबाबत मिळालेल्या सुत्रानुसार दुपारी ४ च्या सुमारास हाँटेल गार्डन समोर (एमएच 39 जे 6848) ही क्रुझर गाडी व मोटारसायकल यांचा समोरासमोर अपघात झाला. अपघात होताच क्रुझरचालक गाडी घेवून फरार झाला आहे. दरम्यान मोटार सायकलवरील तीन जण फेकले जाऊन गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. त्यांचा मदतीला कोणीच पुढे येत नव्हती. ओरड होते वाहने ये जा करत होती. काही वेळानंतर अपघात पाहताच सुरूपसिंग कोकणी यांनी अपघाताची माहिती रुग्ण वाहिका १०८चे पायटल लाजरस गावीत यांना देताच तात्काळ तिथे जाऊन जखमीना रुग्णवाहिकेत घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अपघातात मोटार सायकलवरील वसंत कोकणी, येशु भूसर्या कोकणी, कांतीलाल कोकणी हे जखमी झाले असुन उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. वेळीच उपचार मिळाल्याने जखमीची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.