नवापूर । येथील मध्यवर्ती बस स्टॉप येथे नंदूरबार जिल्हा संपर्क प्रमूख बबनराव थोरात याच्यांहस्ते एसटी कामगार सेनेच्या फलकाचे अनावरण तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी लोकसभा संघटक भगवान बापू करणकाळ, जिल्हा प्रमूख आमशा पाडवी ,तालूका प्रमूख गणेश वडनेरे ,राजेश जयस्वाल, जयप्रकाश परदेशी, एसटी कामगार संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष सूरेश आहिरे, कार्याध्यक्ष संजय शिंदे, अध्यक्ष हंसराज सोमवंशी,सचीव- वसंत गावीत ,सह सचीव राजेद्र सांगळे प्रसिध्दी प्रमूख व्ही. एन. गावीत, संल्लागार भिमसींग गावीत, डी. एन. ठाकरे, वसंत गावीत, गूलाब गावीत, व्ही. एस. देवरे, रोमा गावीत आदी उपस्थित होते.