नवापूर। कुसुमाग्रज प्रबोधिनी नवापूरतर्फे विजय चव्हाण यांच्या निवास स्थानी कुसुमाग्रज प्रबोधिनी नवापूर वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दिप प्रज्वलन कुसुमाग्रज प्रबोधिनी अध्यक्ष विजय डी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कविता वाचन करण्यात आले. पुरकर सरांनी गुढी पाडव्याची कविता सादर करत मराठी नवीन वर्षाची जणु सुरवात केली.
प्रा.जगदीश वाघ यांच्या गझलगायनाने रसिक भारावले
अविनाश जगताप यांनी आपल्या वेगळ्या शैलीत गुढी पाडवा कवितेचे वाचन केले. प्रा.सरतापे यांनी सामाजिक बाधिंलकीवर आधारित कवितेचे वाचन केले. विजय बागुल याची आहिराणी कविता खान्देशाची नाळ जोडून गेली. प्रा. जगदिश वाघ यांनी सादर केलेली गजल त्यांचा गोड गळ्यामुळे छान माहोल तयार झाला. विजय चव्हाण यांची आई वरील कवितेने तर भावनिक नाते तयार केले. उर्दु शायर शब्बीर राहि यांचे शेर काव्य वाचनात दाद नेहमीच मिळवतात. भिमराव गढरी यांचीहि आहिराणी कविता आईची महिमा सांगून गेली. आभार संजय खरे यांनी मानले.