नवापूर येथे जिल्हाधिकार्‍यांनी ठेकदाराचे थांबविले बील

0

नवापूर । शहरातील सराफ गल्लीतील रस्त्याचे केलेले डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे असुन ठेकेदारास कामाचे बिल देऊ नये अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी प्रभारी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या होत्या. नवापुर तालुक्यात जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचा दौरा नुकताच झाला. नवापुर शहरातील सराफ गल्लीत नविन डांबरीकरण रस्ता नवापुर नगरपालिकेने केला होता. मात्र हा रस्ता काही दिवसामध्ये निकृष्ट करण्यात आल्याचे उघड झाले. या नवीन डांबरीकरण रस्त्यावर खड्डे पडले असुन वाहनांचा टायरला डांबर चिटकुन खड्ड् पडत आहते. रस्त्यावर डांबर वितळुन पसरत आहे. कपची रेतीवर येत आहे. एका महिन्यात डांबरीकरण रस्ता निकुष्ट केल्याची पोलखोल झाली आहे. त्यामुळे सराफ गल्लीतील रहीवासी यांनी जिल्हधिकारी यांचा कडे तक्रार दाखल केली आहे . जिल्हाधिकारी डॉ. मलिनाथ कलशेट्टी यांनी चौकशीचे आदेश दिले.

नागरिकांनी घेतला होता आक्षेप
आज जिल्हाधिकारी यांचा आदेशानुसार नवापुर नगरपालिकेचे प्रभारी मुख्यधिकारी शांताराम गोसावी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र दिले असुन पत्रात म्हटले आहे की विषय रस्ता अनुदान अंतर्गत हनुमान मंदिर ते छबीलदास चौक ते नेहरु रोड रस्त्यांचे डांबरीकरण/गटारी बांधकामाचे स्थळ दर्शक पाहणी करुन अभिप्राय देणेबाबत पुढे म्हटले आहे की नवापुर नगरपालीकेने सर्वसाधारण रस्ता अनुदान सन 2015 ते 16 या वर्षा अंतर्गत हनुमान मंदिर ते छबीलदास चौक नेहरु रोड रस्त्याचे डांबरीकरण / गटार बांधकाम करणेचे काम चालु केले आहे. सदर कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 2 लाख 24 हजार 256 एवढी आहे. मक्तेदाराच्या कामाचे मोजमाप करुनच इ.रेकॉडींग करण्यात आले आहे. तथापी या कामा बाबतीत परीसरातील नागरीकांनी डांबरीकरणाचे थरा बाबत आक्षेप घेवुन जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता नंदुरबार यांच्या मार्फत या कामा बाबत अभिप्राय घेणे बाबत आदेश दिले आहे. या कामावसंबंधी तपासणी करुन देणे असे पत्रात म्हटले आहे.