नवापूर । आज समाजामध्ये मुलीचे प्रमाण कमी होत चालले आहे. मुलगाच पाहिजे तो वंशाच्या दिवा या हट्टापायी मुलीला जन्म घेण्या अगोदर तीला गर्भातच मारले जात आहे. यातुनच भृणहत्या सारखे प्रकार घडत आहे. ते रोखण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. शासन स्तरावर अनेक उपाय योजना होत आहे. समाज प्रबोधन केले जात आहे. नवापूर येथे तर एक झाड, बेटी बचाओचा संदेश देत आहे.नवापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गा लगत उपजिल्हा रुग्णालय आहे. रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी हे दरवर्षी परिसरात वृक्षारोपण करत असतात. त्यामुळे आज चांगल्या प्रकारे झाडे बहलेली आहेत. असेच एक पुरातन झाड सूकून मरणावस्थेत असतांना उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश मावची व इतर कर्मचारी यांनी रूग्णालयातील कार्यालया शेजारी असणार्या त्या झाडाला तिरंगेचा कलर मारून त्यावर बेटी बचाव बेटी पढाव, आई मला वाचव, मक जीवनाचा आधार असा समाज प्रबोधनात्मक संदेश लिहला आहे.
परिसराच्या सौंदर्यात पडली भर
ते एक झाड एवढे आकर्षक बनले आहे की रूग्णालयात येणार्या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष केंद्रीत करत आहे. कोणीही आला तर तो ते झाड पाहून प्रसन्न होतो. तसेच त्यावरील संदेश वाचतो. एक सुकलेले झाड व त्यावरील चांगला संदेश लिहुन त्या झाडाचा चांगला उपयोग उपजिल्हा रुग्णालयाने करून त्यातुन चांगला सकारात्मक संदेश दिला आहे. कल्पना सुचली व ती प्रत्यक्ष आमलात आणली. बेटी बचाओचा संदेश मनुष्य व इतर माध्यमे देत असली तरी ते निर्जीव झाड सजीवान सारखे संदेश या माध्यमातून देत असल्याचे दिसत आहे. त्या एक झाडा मुळे परिसरातील सौंदर्यात अधिकच भर पडली असुन ते एक समाजाला एक चांगला संदेश देत आहे. यातून इतरांनी ही शोध व बोध घेणे आवश्यक आहे. जन संदेश यातुन मिळत आहे हे पण नसे थोडके..!