नवापूर । येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अवघा महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन फिफा 2017 फुटबॉलचा उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सदस्य महम्मद मुल्ला, प्राचार्य संजयकुमार जाधव, उपमुख्याध्यापक छोटा सर, उपप्राचार्य आसिफ शेख, पर्यवेक्षक धनसुख चौधरी, मुख्याध्यापक निलेश प्रजापती, प्रा. राजेन्द्र साळुंखे, नरेश जयस्वाल, मनीष पाटील, श्रीकांत पाटील शाळेतील व तालुक्यातील फुटबॉल खेळाडू उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य संजयकुमार जाधव यांनी सांगितले की, इतर खेळासोबत फुटबॉल खेळाचा प्रसार व्हावा, चांगले फुटबॉल खेळाडू यातून निर्माण व्हावे म्हणून याची आवश्यकता आहे. शालेय खेळातुन व्यायामाची सवय लागते व निरोगी शरीर हे आनंददायी शिक्षणासाठी प्रेरक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खेळातून संघ भावना ,एकता, खिलाडीवृत्ती जोपासण्याचे आवाहनही केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्व नियोजन शारीरिक शिक्षकांनी केले होते.