नवापूर येथे महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात

0

नवापूर । शहर व परिसरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जय भोलेचा सर्वत्र गजर होऊन दर्शनासाठी महादेव मंदिरात एकच गर्दी झाली होती. सरदार चौक भागातील पुरातन नागेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी नागेश्वर महादेव मंदिरात 200 लीटर दूध प्रसाद वाटप करण्यात आले यावेळी हिमांशू पाटील, अजय राणा, संतोष आहेर, हरीश पाटील, राहुल ईश्वर पाटील, राहुल पाटील, हर्षल पाटील, हितेश पाटील, निखिल पाटील, रवी पाटील, मितेश पाटील, रवि मराठे, भुषण पाटील, राम पाटील आदी उपस्थित होते.

गावातील जुनी महादेव, नवीन महादेव मंदिरात विविध विधीवत धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. याठिकाणी महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला. कोठडा या गावी सालाबदाप्रमाणे महादेव मंदिर परिसरात भव्य यात्रा भरली होती. तालुका व शहर भागातून सकाळ पासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. येथे होमहवनासह विधीवत पुजाअर्चा दिवसभर चालली यात्रेत अनेक भागातून व्यापारी आले होते. मुलांसाठी मनोरंजक व खेळण्याची दूकानांसह विविध प्रकारच्या दुकाने व स्टॉल लावण्यात आली होती. सायंकाळपासुन यात्रेत दर्शनासाठी गर्दी केली होती. कोठडा ग्रापपंचायतीने यात्रेसाठी व्यवस्थापन करण्यात आले असून गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केले. महाशिवराञी निमित्त सर्वञ हरहर महादेव, बम….बम भोलेचा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.