नवापूर येथे ‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत बैठक

0

नवापूर। येथे वीज वितरण कंपनीतर्फे ‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ग्राहक संवाद व संपर्क अभियान महावितरण कार्यालय नवापूर येथे राबविण्यात आले. याप्रसंगी विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन चव्हाण, उपकार्यकारी अभियंता राकेश गावित तसेल पंचायत समिती सदस्य जालमसिंग गावित, शिवशाहीर सुनिल पवार,भाजयुमोचे उपाध्यक्ष रोशन वसावा,उमेश भोई, राजू परदेशी व शहरी तथा ग्रामीण भागातील वीजग्राहक नागरिक उपस्थित होते. वीज ग्राहकांचे प्रश्न सोडवले जावे ग्राहक व कर्मचार्‍यांमधील दरी कमी व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवविण्यात आला.

तक्रारींवर त्वरीत कार्यवाहीचे आश्‍वासन
याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य जालमसिंग गावीत,मंगेश येवले सुनिल पवार यांनी नागरिकांच्या वतीने विविध समस्यांची मांडणी केली. अनिल पाटील यांनी यावर त्वरित कारवाई करून योग्य तो बदल घडविण्याचे आश्वासन दिले. तसेच समस्यांचे लवकरात लवकर समाधान करण्यात येईल असेही सांगितले. यावेळी वीज बिल रिंडींग न घेता बील भरमसाठ येणे ही तक्रार असंख्य शहरी व ग्रामीण भागातील विज ग्राहकांनी यावेळी मांडली. तसेच तक्रारी अर्जाची दखल घेतली जात नाही अशी तक्रार काही ग्राहकांनी केली. तसेच शहरी भागात तक्रार निवारण कार्यालय घेण्यासाठी अटी व शर्ती शिथिल करण्याची मागणी येवले यांनी यावेळी केली. वीज ग्राहकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सचिन चव्हाण यांनी दिले. याप्रसंगी वीज कंपनीचा मोबाईल अँपची माहिती देण्यात आली. नवापूर महावितरण कंपनीचे राकेश गावित यांनी सूत्रसंचालन यांनी केले. तर आभार डी. आर. पाटील यांनी मानले.