नवापूर । श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद वाघ होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक एम.जे. सोनवणे, ए.बी. थोरात,वरिष्ठ शिक्षक एस.डी. सूर्यवंशी, श्रीमती सी. एन. बर्डे, कुटे मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व प्रथम सरस्वती वंदन,लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचेे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वक्तृत्व स्पर्धेत इ.9वी ते 10वी च्या गटात प्रथम कोमल पाटील द्वितीय मिताली जगताप तृतीय दर्शन पाटकर 11वी12च्या गटात प्रथम प्रसाद गावीत द्वितीय ऋषिकेश बागले , रोशनी मावची स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र पेन व पुस्तक देऊन सत्कार केला. या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून जे.ए. पाठक, बी.एम. सैंदाने व एस. एस. खैरनार यांनी काम पाहिले. प्रास्ताविक एम. जे. सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रियंका गावीत, योगेश गावीत यांनी तर आभार विशाल वळवी यांनी मानले. शुभांगी वसावे, अंकिता देसाई व कुश वसावे आदींनी कामकाम पाहिले.
करंजी विद्यालयात टिळक पुण्यतिथी साजरी
तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,करंजी बु या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश घरटे होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पुजनाने करण्यात आली. विद्यार्थी मनोगतातून ज्योती गावीत, रचना गावीत, शिरीष गावीत, रितु गावीत, सागर गावीत, निलिशा गावीत, योहीना गावीत, अमित गावीत, मार्था गावीत आदि विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे विचार मांडलेत. प्रास्तविक राजधर जाधव, सूत्रसंचालन सी.एस.बागुल तर आभार आर.के. सीसोदीया यांनी मानले. यशस्वीतेसाठी महेश पूरकर, प्रा.दीपाली खैरनार, प्रीती गावीत आदि शिक्षकेतर सहकारी यांनी कामकाज पाहिले.