नवापूर । छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. शिवचरित्रकार प्रा. जावेद शेख यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जि. प अध्यक्षा रजनी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन दिपप्रज्वलन करुन उद्घाटन केले. रविवारी सकाळी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्याक्षा हेमलता पाटील, नगरसेवक आशिष मावची, विश्वास बढोगे, विशाल सांगळे, नगरसेविका सारीका पाटील, अरुणा पाटील, बबीता वसावे, मंगला सैन, मीनल लोहार, माजी नगरसेवक अजय पाटील, सौ सुशिला अहिरे, जिल्हाउपप्रमुख हंसमुख पाटील, तालुका उपप्रमुख गणेश वडनेरे, शहर प्रमुख गोविद मोरे, माजी नगराध्यक्ष दामु बिराडे, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, डाँक्टर असोचे अध्यक्ष डाँ कमलेश पाटील, राजु अग्रवाल, दैनिक पञकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील, शंकर दर्जी, शैला टिभे, प्रकाश पाटील, शरद लोहार, भाजप चे उपाध्यक्ष अनिल वसावे, उद्योगपती रमेशचंद्र अग्रवाल, दर्शन पाटील, सौ विद्या चौधरी, ज्योती चौधरी, सौ उज्वला वडनेरे, प्रविन ब्रम्हे, अनिल वारुडे, मनोज बोरसे, जितेंद्र अहिरे, भाजपचे शहर अध्यक्ष निलेश प्रजापत, विजय सैन उत्सव समिती चे अध्यक्ष राहुल टिभ, महेंद्र चव्हाण, सुधीर निकम, मंगेश येवले, निलेश पाटील, प्रकाश खैरनार, आदी उपस्थित होते.
शिवस्मारकासाठी प्रयत्न करणार!
रविवारी 4 मार्च रोजी सकाळी 9 वाजता मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. मोटारसायकल रँलीची सुरुवात नवापूर नगरपालिकेपासून करण्यात आली. मोटारसायकल रॅलीला झेंडी दाखवून आदिवासी सहकारी कारखाना चेअरमन शिरीष नाईक यांनी शुभारंभ केला. या नंतर सकाळी 10 वाजता शिव प्रतिमा पुजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिव प्रतिमा पुजन माजी जि. प अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्ष हेमलता पाटील, न. पा गटनेते गिरीष गावीत, पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सह नगरसेवक, राजकीय कार्यकर्त, व्यापारी, अधिकारी उपस्थित होते. यावेळी भरत गावीत म्हणाले की, सर्वानी शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले तर खर्या अर्थाने जयंती साजरी होईल. येत्या पाच वर्षात नवापूर शहरात शिवस्मारक होण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी दिले.शिवशाहीर सुनील पवार, प्रा कमलेश पाटील, महेंद्र अहिरे, निलम पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भटु जाधव यांनी तर प्रास्ताविक महेंद्र अहिरे यांनी केले आभार मनोज बोरसे यांनी मानले.