नवापुर। नवापुर शहरात नगरपालिकातर्फे विविध विकास कामांचा शुभारंभ माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत व आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक, नगराध्यक्षा रेणुका गावीत यांच्याहस्ते करण्यात आला. लहान चिंचपाडा भागात पाणीपुरवठा योजना करणे महात्मा गांधी वाचनालय ते अमरधाम रस्तापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे, जवळपास 1 कोटी रुपये खर्चीक कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनराध्यक्ष हारुण खाटीक, गटनेते गिरीष गावीत, शेतकी संघाचे अध्यक्ष अजित नाईक, नरेंद्र नगराळे, आयुब बलेसरीया, आरीफ पालावाला, अजय पाटील, चंद्रकांत नगराळे, शिरीष प्रजापत, मेघा जाधव, रिना पाटील, रजीला गावीत, अनिता मावची, माजी नगरसेवक रमला राणा, विनय गावीत, शरद पाटील, संदिप गावीत, तालुका कॉग्रेसपक्षाचे उपाध्यक्ष आर.सी.गावीत, जैयनु गावीत आदी उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्यासह रस्त्यांचे काँक्रिटीकरण
या योजनेमुळे आदिवासी बहुवस्ती असलेला लहान चिंचपाडा भागात पाण्याची पाईप लाईन टाकण्यात येणार असल्याने याभागातील पिण्याचा पाण्याची समस्या कायमची सुटणार आहे. तसेच महात्मा गांधी वाचनालयाजवळील रस्ता बर्याच वर्षापासुन खराब असल्याने सदर काम करण्याबाबत परीसरातील नागरीकांनी वेळोवेळी रस्ता तयार करण्याची मागणी करत होते. ती मागणी निमिताने आता पुर्ण होणार असुन हा संपुर्ण रस्ता कॉक्रीटीकरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बांधकाम विभागाचे अभियंता सुधिर माळी, सतिष बागुल, राजु गावीत, प्रकाश ब्राम्हणे आदिनी परीश्रम घेतले. नगर पालिकेतर्फे सत्ताधारांनी नगर पालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन विविध कांमाचा सपाटा सुरु केला आहे.