नवापूर येथे सार्वजनिक मुतारी करा

0

नवापूर। शहरात सार्वजनिक मुतारी ची व्यवस्था करण्याबाबतचे निवेदन तहसिलदार प्रमोद वसावे व न.पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे यांना नवापुर मर्चंट सेवा असो च्या पदाधिकारी आणि व्यापार्‍यांनी दिले. या निवेदनात म्हटले आहे नवापूर शहरातील मच्छीबाजार, लाईट बाजार ह्या ठिकाणी सार्वजनिक मुतारी नसल्याने नागरिकांना भिंतीचा आडोसा घेऊन आपली नैसर्गिक प्रक्रिया पार पाडावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

महिलांसाठी संपूर्ण शहरात मोजक्या ठिकाणीच स्वछता गृह असून खेड्या पाड्यातून बाजारासाठी येणार्‍या महिलांना सुद्धा ह्या समस्यांचा सामना करावा लागत असून ही लवकरात लवकर मुतारीची व्यवस्था करावी अन्यथा व्यापारी असो तीव्र आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. तहसीलदार, मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर अध्यक्ष राजेश अग्रवाल, उपाध्यक्ष मंगेश येवले आणि सचिव विजय बागुल यांच्या स्वाक्षरी आहेत.