नवापूर येेथे गणेशमुर्ती विक्रीसाठी व्यावसायिकांची लगबग

0

नवापूर । अवघ्या आठ दिवसांनी येणार्‍या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली असुन मोठ्या गणेश मंडळाचा गणेश मुर्तीची बुकींग यापुर्वीच झाली आहे. शहरातील अनेक व्यवसायिकांनी गणेश मुर्ती विक्रीचे दुकान थाटले आहे. काही वर्षा पुर्वी इतर जिल्हा व राज्यातुन पेणचा मुर्ती विक्रीसाठी शहरात यायचे पण मागील दोन वर्षांपासुन शहरातील व्यवसायिक,सुशिक्षित तरुण अन्य राज्यातुन व जिल्हातुन मुर्ती आणुन व्यवसाय करु लागले आहे. मोठ्या मंडळाचा मुर्ती यापुर्वी शहरातील मुर्तीकार बनवायचे त्या शाडु मातीचा असायच्या कालांतराने वेळ काळ बदलत जाऊन आतापर्यत नंदुरबार येथुन गणेश मुर्ती बनविण्याची बुकींग मुर्तीकारांकडे करुन दरवर्षी तेथुन गणेश भक्त ट्रकने वाजत गाजत मुर्ती आणण्याची प्रथा पडली. ती आज तागायत सुरु आहे.

सामाजिक, धार्मिक देखावे : यावर्षी गणेश मुर्ती विक्रीची दुकाने वाढली आहे कारण मागच्या वर्षी शेवटचा दिवशी सर्व व्यवसायिकांचा लहान मोठ्या सर्व गणेश मुर्ति विक्री झाल्या होत्या आणि गणेश मुर्तीची टंचाई निर्माण झाली होती. भाविकांना शोधुन मुर्ती सापडत नव्हती. यंदा सामाजिक व धार्मिक विषयावर देखावे पाहायला मिळणार आहे. या वर्षी गणेश मुर्ती विक्रीची दुकाने दुप्पट झाली असुन नगर पालिकेने टाऊन हाँल समोर त्यांना जागा उपलब्ध करुन दिली आहे.दादा, बाबा, मामा, काका, तात्या या मोठ्या मंडळाने यापुर्वीच तयारी सुरु केली असुन मंडप लाईटिंग व इतर व्यवस्था करुन ठेवली असुन डेकोरेशनचे काम सुरु आहे यंदा ड्राँ चे प्रमाण ही वाढले असुन तिकिट विक्री व जाहीराती करण्यात येत आहे. यंदा बालगोपाल मंडळीची मंडळांमध्ये वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. प्रत्येक घराघरात आता गणेशाची स्थापना करण्याचे प्रमाण दिवसें दिवस वाढत चालले आहे.

गणेश आगमनाची प्रतिक्षा
यंदा जीएसटीमुळे गणेश मुर्तीचा किंमती वाढल्या आहे. सर्वत्र आकर्षक पेणचाच मुर्ती दिसत असुन शाडु मातीचा मुर्ती कालबाह्य होऊ पाहत आहे. पर्यावरणाला पुरक शाडु मातीचा गणेश मुर्ती आज काही जण बसवितात ती एक चांगली गोष्ट पाहायला ही मिळते. गणरायांचा आगमनांची ओढ लहान मुलांपासुन युवक व वृध्दापर्यत सर्वानाच लागली आहे. शांतता कमेटीची बैठक काही दिवसांनी होणार आहे. यंदा गणपती बाप्पा लवकर आल्याने गणेश भक्त आनंदात आहे. सर्व भाविक गणेश स्थापनेचा जय्यत तयारीला लागले आहेत