नवापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 16 प्रवाशी जखमी

0

नवापुर। नवापुर राष्ट्रीय महामार्ग 6 वर आज लक्झरी क्रमाक जी.जे.5 ए.व्ही.3101 व ट्रँक क्रमाक एम .एच. 23 डब्लू 3955 हे ऐकमेकांना मागे टाकण्याच्या धडपडीत समोरा समोर धडकले. हा अपघात दुपारी 1 वाजेला रायंगण गावाच्या पुलाजवळ 1 कि.मी अंतरावर झाला. यामुळे सुमारे 3 तास महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.या अपघातात लक्झरी व ट्रक यांच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

लक्झरी बस मालेगावहून सुरतकडे जात होती ; जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू
लक्झरीमध्ये प्रवासी होते ही लक्झरी बस मालेगावहुन सुरत कडे जात होती. बसमधील चालकासह 16 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीना 108 रुग्णवाहीकेने उपजिल्हा रुग्णालयात दाखल जखमी प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे (1) पुष्पाबाई मारुती जाधव(वय 60) धुळे (2) सोनाराम चौधरी (वय 30) गाव दहीवेल (3) निलीमा नवल देवरे (वय 28) जयताने (4) नाना तुकाराम पाटील (वय 32) मालेगाव (5) हसनशेख निर्जा (वय 47 )धुळे (6) कविता भानुदास महाजन (वय 36 ) धुळे (7) सरला श्रीकात सुर्यवंशी (वय 40) धुळे (8) श्रीकात विरभान सुर्यवंशी (वय 47) धुळे (9) सुभाष सुकदेव खलाने (वय 51) धुळे (10) प्रविन मुरलीदर जाधव (वय 26) सुरत (11)इरफानाबाई शेख शखील (वय 48) साक्री (12) पुष्पाबाई विजय पाटील (वय 32) धुळे (13) गिरीष विजय पाटील (वय 12) धुळे (14) विजय बापु पवार (वय 50) मालेगाव (15) महेंद्र सखाराम पाटील (वय 22) धुळे (16) भानुदास हिरामान महाजन(वय 40) धुळे हे जखमी झाले असुन त्यांचा उपचार डॉक्टर मनिषा वळवी, कल्पना चौधरी, सीमा वळवी,शबरी गावीत,तेजल पाडवी करीत आहे . घटनास्थळी सपोनि ताथु निकम.पो.का.,अनिल राठोड,प्रविन मोरे,गणेश पाटील यांनी येऊन पंचनामा केला आहे.