नवापूर : नवापूर शहरालगत रेल्वे स्टेशन रस्त्यावर अवैध पद्धतीने ताजे तोडीचे खेरजातीचे लाकूड चोरून नेत असताना वनअधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत वाहनासह एकूण २ लाख २२ हजारांचा माल जप्त करून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखला करण्यात आला आहे. नंदुरबार सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक धडगावचे एस.आर.चौधरी, वनविभाग शहादा तसेच नवापूर वनक्षेञपाल प्रथमेश हाडपे यांना शासकीय जिपने सुरत ते हायवे रोडने गस्त करीत असताना बिना नंबरची गाडी आढळून आली.
वाहनास अटकाव करुन थांबवून वाहन चालकास पकडून वाहनाची तपासणी केली असता ताजे तोडीचे खेरजातीचे लाकुड आढळुन आले. सदर वाहनासह आरोपीस चौकशी कामी ताब्यात घेतले असून वाहन व मुद्देमाल शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा केले आहे. अवैधरित्या वाहतूक केल्याने वनपाल वडकळंबी यांनी आरोपी दिलीप कोकणी रा. बारी यांचा विरुध्द गुन्हा जारी केला आहे. जप्तमुदेमाल खेर जातीचे लाकुड २.८३५ घनमीटर किंमत २२ हजार ६८० रुपयाचा माल व वाहनाची किमत २लाख रुपये सर्व मिळून एकूण २ लाख २२ हजार ६८० रुपयाचा माल जप्त केला आहे. सदर कार्यवाहीत वनक्षेपाल प्रथमेश हाडपे, वनपाल प्रकाश मावची, एस आर कासार, ए एन जाधव, ज्योतीबाराव कांदे, वाहन चालक एस.एस.तुंगार यांनी परीश्रम घेतले. पुढील तपास उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा व सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांचा मार्गदर्शनाखाली सुरु आहे.