नवापूर । येथील वीज वितरण कपनींचे कार्यालय शहरापासून 1 किलो मिटर अंतरावर आहे. महावीज वितरण कंपनीच्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे मीटर तपासणी (रिडींग) न घेताच अंदाजित बिल बनवणे, मीटर फॉल्टी दाखवणे हे नियमित होत असून नागरिकांना बिल दुरुस्तीसाठी अथवा त्यासंबंधी तक्रार करावयाची असल्यास कार्यालयात जाणे येणे जिकरीचे ठरत होते. कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेहमीच विस्कळीत होत असे या सर्व समस्यांनी नागरिक त्रस्त होते. ह्या बाबतीत नवापूर विकास आघाडीतर्फे गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. आघाडीतर्फे 15 ऑगस्टरोजी आंदोलनाचा पवित्रा घेवून बेमुदत सत्याग्रह सुरू केला होता. मात्र, तहसिलदार वसावे यांनी हस्तक्षेप महा वितरण कंपनीच्या कार्यालया तत्पुरत्या स्वरूपात महावितरणचे कार्यालय उघडण्यात आले.
कायमस्वरूपी कार्यालय सुरू करणार
योग्य जागा मिळाल्यास तेथे कायमस्वरूपी कार्यालय सुरू करण्यात येईल असे सांगितले आहे. महाविज वितरण कपनींने आंदोलनकर्त्यांना लिखित ग्वाही दिले पत्रात नमूद केले आहे की कायम स्वरूपी तक्रार निवारण कार्यालयासाठी आजच एका दैनिकात जागेसाठी जाहीर निविदा काढली असून योग्य जागा मिळाल्यावर तेथे कायम स्वरूपी कार्यालय सुरु करण्यात येईल तरी नागरिकांनी तहसील कार्यालया जवळ सुरु करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्षात तक्रारी येथे दाखल कराण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिकात निविदा प्रसिद्ध
नवापूरचे तहसिलदार प्रमोद वसावे यांनी आंदोलनाची दखल घेत आपल्याच कार्यालयात महावितरणाच्या कार्यालयास जागा उपलब्ध करून देत कार्यालयाचा शुभारंभ केला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत आणि विज वितरण कंपनीचे उपअभियंता बी. एस. कोळे, चव्हाण, जु. ई. श्रीमती गावत आदींसह कर्मचार्यांनी सहकार्य केले. महावितरणतर्फे आंदोलकांना लिखीत ग्वाही देण्यात येऊन कायमस्वरूपी तक्रार निवारण कार्यालयासाठी आजच एका दैनिकांत निविदा प्रसिध्द केली असल्याची माहिती कोळे यांनी दिली आहे.
जाता जाता काम करुन गेले
विज वितरण कंपनीचे उपअभियंता बी. एस. कोळे यांची बदली झाली आहे. विकास आघाडीने कोळे यांना भेटुन तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यासाठी मागणी केली होती. कोळे यांनी या समस्येची गांभिर्याने दखल घेत वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार करुन पाठपुरावा केला. त्यामुळे तक्रार निवारण कक्ष कायम स्वरुपी करण्यासाठी वृत्तपत्रात 15ऑगस्टलाच निविदा प्रसिध्द ही झाल्याने योग्य जागा मिळाल्यावर शहरात कायम स्वरुपी तक्रार निवारण कक्ष सुरु होणार आहे. यामुळे कोळे जातात काम करुन केले असे म्हटले जात आहे.